रश्मी ठाकरे आणि अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट; भाजप पदाधिकारी अटकेत (Video)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या बद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.
जीतेन गजारीया
जीतेन गजारीयारश्मी पुराणिक

वैदेही काणेकर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या बद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. ट्विट करणाऱ्या भाजपचा पदाधिकारी जीतेन गजारीया (Jiten Gajaria) याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ताब्यात घेतलं आहे. जीतेन गजारीया याने रश्मी ठाकरे यांच्या सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दलही ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्यं केलंय.

जितेन गाजरीया ट्विट
जितेन गाजरीया ट्विटवैदेही काणेकर

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये एकमेकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आरोप सुरु असल्याचे दिसून येत आहे. मात्र, काहींकडून प्रत्यारोपाची मर्यादा ओलांडल्याचे दिसत आहे. सध्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi Government) नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया विरोधी पक्षाकडून सर्रास होत आहेत असे दिसून आले आहे. यात मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही आक्षेपार्ह प्रतिक्रिया सोशल मीडियातून समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी भाजपच्या एका नेत्याला आयटी सेलने अटक देखील केली आहे. त्यांच्याकडून ट्विटरवर रश्मी ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख राबरी देवी असा केलेला आहे. सध्या हे ट्विट व्हायरल होत असून काही वेळेपासून जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

पहा व्हिडीओ-

जीतेन गजारीया
Rashmi Thackeray : रश्मी ठाकरेंबाबत ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट; जितेन गजारिया पोलिसांच्या ताब्यात

रश्मी ठाकरेंविरुद्ध आणि अजित पवार यांच्याविरुद्ध हे वक्तव्य एक भाजप पदाधिकाऱ्याने केले आहे. या ट्विटबद्दल माहिती मिळताच राजकीय वर्तुळामध्ये त्याचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटल्याचे दिसून आले. त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. भाजपला सत्ता न मिळाल्यानं पोटशुळ उठल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com