Big News : भाजप सरकार स्थापन करणार? पुढचे ४८ तास अतिमहत्वाचे! भाजपच्या सर्व आमदारांना 'हे' आदेश

Political Crisis In Maharashtra : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे मविआ सरकार धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या (BJP) गोटातही हालचालींना वेग आला आहे.
Big News : भाजप सरकार स्थापन करणार? पुढचे ४८ तास अतिमहत्वाचे! भाजपच्या सर्व आमदारांना 'हे' आदेश
Political Crisis In MaharashtraSaam Tv

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे मविआ सरकार धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या (BJP) गोटातही हालचालींना वेग आला आहे. भाजपने आपल्या सर्व आमदारांना भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपने "पुढचे ४८ तास संपर्कात राहा" असा आदेश आपल्या सर्व आमदारांना दिला आहे. तसंच कोणत्याही दौऱ्यावर आणि परदेशात जाऊ नका, कोणत्याही क्षणी तुम्हाला मुंबईत पोहचायला लागू शकतं त्यामुळे संपर्कात रहा असं भाजपने आपल्या सर्व आमदारांना सांगितलं आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

भाजपने आपल्या सर्व आमदारांना अशा सूचना दिल्याने महाविकास आघाडीची धाकधूक आणखीन वाढली आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचं सांगितलं होतं. शिवसेनेचे एकुण ५५ आमदार आहेत, त्यातले सुमारे ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे मविआ सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे. तर दुसरीकडे भाजपने वे अॅन्ड वॉचची भूमिका घेतली असली तरी पडद्याआड प्रचंड हालचाली सुरू आहेत.

दरम्यान आसाम विमानतळावर बोलताना शिंदे यांनी माझ्यासोबत ४० आमदार असून इतर १० आमदारांचा पाठिंबा देखील मिळणार असल्याचं सांगितलं आहे. शिवाय आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील राजकारणात बरीच उलथापालत होणार असल्याचं दिसतं आहे. शिवाय एकनाथ शिंदे हे भाजपसोबत सरकार स्थापन करण्यात यशस्वी होणार की महाविकास आघाडी आणखी काही खेळी करणार याकडे राज्यभरातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.

Political Crisis In Maharashtra
Maharashtra Politics : "एकनाथ शिंदे कमळाच्या जाळ्यात अडकले!" शिवसेनेच्या मुखपत्रातून बोचरी टीका

सामशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी आम्ही हिंदुत्वाच्या मुद्दयावर फारकत घेऊ शकत नाही. तसंच जे हिंदुत्व बाळासाहेबांचे आहे ते हिंदुत्व आणि तीच कडवट भूमिका घेऊन आपण या पुढील राजकारण समाजकारण करणार असल्याचंही शिंदे म्हणाले. शिवाय आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत. एकीकडे शिवसेनेने एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव नाकारला आहे, तर दुसरीकडे भाजपने मात्र हालचाली सुरू केल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com