Gujrat Election : गुजरात निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली; शेलारांवर सोपवली मोठी जबाबदारी

मागील गुजरात निवडणुकीत आशिष शेलार आणि त्यांच्या टीमने सूरतमध्ये चांगली कामगिरी केली केली होती.
ashish shelar
ashish shelarSaam Tv

BJP Gujrat Election News : आगामी गुजरात निवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांवर गुजरातमधील काही मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे सूरतमधील १० मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे. (Ashish Shelar News Today)

ashish shelar
Eknath Shinde : वेदांता प्रकल्पावरून शिंदे एकटे पडलेत? दिल्ली दौऱ्यावर भाजपचा एकही नेता नाही!

उत्तर प्रदेश, गोवा निवडणुकीच्या प्रचारासाठी देखील भाजपचे राज्यातले नेते गेले होते. तशाच पद्धतीने राज्यातल्या प्रत्येक नेत्यांवर गुजरात निवडणुकीची जबाबदारी देण्यात येणार आहे. भाजपच्या राज्यातील नेत्यांची नुकतीच एक बैठक पार पडली असून, या बैठकीत गुजरात निवडणूकीसाठी सज्ज व्हा असे आदेश देण्यात आले आहेत.

गुजरातमध्ये साधारण डिसेंबर महिन्यात निवडणुका पार पडणार आहेत. मागील गुजरात निवडणुकीत आशिष शेलार आणि त्यांच्या टीमने सूरतमध्ये चांगली कामगिरी केली केली होती. त्यामुळे यंदाही शेलार आणि त्यांच्या टीमवर्कवर केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला आहे. (BJP (Maharashtra Latest News)

दरम्यान, आशिष शेलार जर गुजरातला जाणार असणार तर भाजप मुंबई महापालिका निवडणूक कोणाच्या नेतृत्वात लढवणार, असा सवाल उपस्थित होत आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात मुंबईत महापालिका निवडणूक होणार, असे बोलले जात होत. मात्र यासाठी आता सरकार तयार नाही आहे का, अशी चर्चा रंगली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com