मला सुद्धा धक्का होता...; 'त्या' टोमण्यानंतर अमृता फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांना महाउत्सव कार्यक्रमात अप्रत्यक्ष टोला लगावला होता.
मला सुद्धा धक्का होता...; 'त्या' टोमण्यानंतर अमृता फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंवर पलटवार
Amruta Fadnavis befitting reply to CM Uddhav Thackeray, Amruta Fadnavis Latest Marathi News, Amruta Fadnavis NewsSAAM TV

मुंबई: भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय ढवळून निघालं आहे. भाजप, शिवसेना आणि शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये टीका-प्रतिटीका सुरू असतानाच, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक फटकेबाजी सुरू आहे. अमृता फडणवीस यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनीही नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. हा शाब्दिक युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता अमृता फडणवीस यांनीही ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, बाकीचे सुद्धा गातात, असा टोला ठाकरेंनी लगावला होता. त्यावर अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं असून, अब्जाधीश फक्त आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीश आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Amruta Fadnavis Latest Marathi News)

Amruta Fadnavis befitting reply to CM Uddhav Thackeray, Amruta Fadnavis Latest Marathi News, Amruta Fadnavis News
Nashik: कोश्यारींच्या हस्ते कृषी पुरस्कार स्विकारण्यास राजेंद्र पवारांचा नकार

भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. उत्तर प्रदेशात भोंगे उतरवल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगी सरकारचं कौतुक करतानाच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्रात सत्तेचे भोगी आहेत, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही योगी सरकारचं कौतुक करतानाच, ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. ये 'भोगी', काहीतरी शिका आमच्या 'योगी'कडून, असं ट्विट फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर अमृता फडणवीसांच्या टीकेला मुख्यमंत्री ठाकरे यांनी कालच्या महाउत्सव कार्यक्रमात अप्रत्यक्ष टोला लगावून प्रत्युत्तर दिलं होतं. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यनं सांगितलं होतं. मला खरंच हा धक्का होता. मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, बाकीचे सुद्धा गातात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेनंतर आज ट्विट करून अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा लक्ष्य केलं आहे.

अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीकासौजन्य - ट्विटर

'मला सुद्धा धक्का होता, मला वाटतं होतं, अब्जाधीश फक्त आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीश आहे! छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात,' असं अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याशिवाय ट्विटमध्ये त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केलं आहे. आता अमृता फडणवीस यांच्या टीकेला उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.