
अभिजीत गायकवाड
कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेनेतील धुसफूस संपण्याचं नाव घेत नाही. शिंदे गट आणि भाजपमधील तणाव कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटापुढे भाजपचं काहीच चालत नाही, असा आरोप भाजपचे स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी केला होता. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या आरोपानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. (Latest Marathi News)
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गट-भाजपमध्ये तणाव वाढला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांची नार्को टेस्ट नाही तर सायको टेस्ट करा, अशी टीका शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केली आहे.
महेश गायकवाड यांनी पुढे म्हटलं की, धनुष्यबाण आमचा स्वाभिमान आहे. धनुष्यबाणावर टीका करू नका, तुमचं रॉकेट जनता कोणत्या जागेत घालेल हे सांगता येणार नाही. पोलीस प्रोटेक्शन बद्दल बोलताय तर आमदार गायकवाड यांच्या दोन्ही मुलांना पोलीस प्रोटेक्शन, पोलीस घराबाहेर बसलेले असतात.
कल्याण पूर्व मतदारसंघात विकास नाही तर फक्त भ्रष्टाचार झाला आहे. खोटे नाटे आरोप करत प्रसिद्धी मिळवण्याचा आमदार गणपत गायकवाड यांचा प्रयत्न आहे. आमदार गायकवाड युतीत काडी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही युती धर्म पाळतोय आणि पालन करत राहणार, असंही महेश गायकवाड यांनी म्हटलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.