BJP- Shivsena नाराज सुरेश गंभीर पुन्हा शिवसेनेत येणार?

सुरेश गंभीर हे शिवसेनेचे माजी आमदार होते. 2016 मध्ये त्यांनी शिवबंधन सोडून भाजपचे कमळ हातात घेतले होते.
BJP- Shivsena नाराज सुरेश गंभीर पुन्हा शिवसेनेत येणार?
BJP- Shivsena नाराज सुरेश गंभीर पुन्हा शिवसेनेत येणार?Saam Tv news

मुंबई : २०१६ मध्ये भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेले शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार सुरेश गंभीर (Suresh Gambhir) यांनी आज माँ साहेब मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) यांच्या स्मृती दिनी शिवतीर्थावर (shivtirth) येऊन अभिवादन केले. तसेच, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. तथापि,उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीबाबत गंभीर यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. परंतु, मी मनाने अजूनही शिवसैनिक असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केले आहे.

हे देखील पहा-

सुरेश गंभीर हे शिवसेनेचे माजी आमदार होते. 2016 मध्ये त्यांनी शिवबंधन सोडून भाजपचे कमळ हातात घेतले होते. मात्र, बऱ्याच काळापासून ते भाजपवर नाराज होते. परिणामी ते भाजपमध्ये कधीच फारसे रमले नाहीत. सुरेश गंभीर यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे सुरेश गंभीर आणि त्यांच्या दोन्ही कन्यांची शिवसेनेत घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

BJP- Shivsena नाराज सुरेश गंभीर पुन्हा शिवसेनेत येणार?
Belgaum News पोलीसांचा हुल्लडबाज समर्थकांना चोप

शामल सुरेश गंभीर आणि शीतल सुरेश गंभीर यां दोन्ही मुलींनीही भाजपमध्ये सुरेश गंभीरयांच्या सह प्रवेश केला होता. शीतल गंभीर या भाजप वार्ड क्रमांक १८२ च्या भाजप नगरसेविका आहेत, तर शामल या भाजपमधून उभे असताना त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे सुरेश गंभीर आणि त्यांच्या दोन्ही कन्याची घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. सुरेश गंभीर दादर माहीम मतदार संघातून शिवसेनेचे ३ वेळा आमदार राहिले आहेत.

कोण आहेत सुरेश गंभीर?

शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून सुरेश गंभीर शिवसेनेच्या जुन्या जाणत्या नैत्यांपैकी एक आहेत. सुरुवातीला 1978 मध्ये ते माहीम परिसरातून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतरच्या काळातही माहीम मतदासंघातून त्यांची चारवेळा विधानसभेवर निवड झाली.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com