"भाजपने आमच्यासोबत मिळून राज्य करावं" - संजय राऊतांची भाजपला ऑफर?

"भाजपला सुदैवाने विरोधीपक्ष पद मिळालंय, त्यांनी आमच्यासोबत मिळून रुल (राज्य) करावं" असं अजब विधान संजय राऊत यांनी केलंय.
"भाजपने आमच्यासोबत मिळून राज्य करावं" - संजय राऊतांची भाजपला ऑफर?
"भाजपने आमच्यासोबत मिळून राज्य करावं" - संजय राऊतांची भाजपला ऑफर?Saam Tv

मुंबई: महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) येत्या २८ डिसेंबर रोजी दोन वर्ष पुर्ण होतायत, त्याच पार्श्वभूमीवर साम टिव्हीने संजय राऊत (Sanjay Raut) यांची मुलाखत (Interview) घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर मनसोक्तपणे आपली मतं मांडली. "भाजपला सुदैवाने विरोधीपक्ष पद मिळालंय, त्यांनी आमच्यासोबत मिळून रुल (राज्य) करावं" असं अजब विधान त्यांनी केलंय. ("BJP should rule with us" - Sanjay Raut's offer to BJP?)

हे देखील पहा -

संजय राऊत म्हणाले की, सरकार पडणार अशा पुड्या भाजप (BJP) सोडत असतं, पण याची काय गरज आहे. संसदीय लोकशाहीमध्ये प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षाचं स्थानसुद्धा खूप महत्वाचं असतं. विरोधी पक्षनेता हा शॅडो चीफ मिनीस्टर असतो, आणि तुमचा तेवढा ताकदीचा विरोधीपक्ष आहे. तुम्ही राज्य आपल्या मुठीत ठेवलं पाहिजे, ज्याप्रकारे तुम्ही फालतू चिखलफेक करता, धुराळा उडवता ते तुमच्या (भाजपच्या) प्रतिष्ठेला शोभणारं नाही असं राऊत म्हणाले.

"भाजपने आमच्यासोबत मिळून राज्य करावं" - संजय राऊतांची भाजपला ऑफर?
अडीच अडीच वर्ष ही अफवा- संजय राऊत...(पहा व्हिडिओ)

पुढे ते म्हणाले की, आम्ही केंद्रात आणि महाराष्ट्रात असताना खूप विरोधी पक्षनेते पाहिले, आणि आम्हाला असं वाटायचं की, राज्यात मंत्री किंवा मुख्यमंत्री होण्यापेक्षा कधीतरी विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे. यांना सुदैवाने सगळं मिळालं आहे तर यांनी राज्यावरती आमच्यासोबत रुल (राज्य) केलं पाहिजे. ते सुद्धा विरोधीपक्ष म्हणून राज्यावर रुल करु शकता, त्यांच्या विधायक कामांचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नक्कीच आदर करतील असंही संजय राऊत म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com