राज्यपालांनंतर भाजप प्रवक्ते त्रिवेदींचं शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; काँग्रेसची सडकून टीका

भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
sudhanshu trivedi
sudhanshu trivedi saam tv

रश्मी पुराणिक

Sudhanshu Trivedi News : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे, याचदरम्यान आता भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाजेबाची पाच वेळा माफी मागितली, असे विधान भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केलं आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा देशात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. (Latest Marathi News)

भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हे एका हिंदी वृत्त वाहिनीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर चर्चा सुरू होती. यावेळी भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही विनायक सावरकर यांच्यासोबत केली. सुधांशु त्रिवेदी यांच्या या डिबेटमधील शिवाजी महाराजांवरील विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

सुधांशु त्रिवेदी म्हणाले, 'राहुल गांधी म्हणाले की वीर सावरकर यांनी माफी मागितली आहे. मात्र, माफीनाम्यावर बोलायचं झालं तर, त्याकाळी सुटका होण्यासाठी अनेक जण माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील औरंगाजेबाला ५ वेळ पत्र लिहून माफी मागितली'.

sudhanshu trivedi
Sanjay Raut : पुन्हा तुरुंगात टाका पण घाबरणार नाही, मला कुणी गप्प करु शकणार नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

सुधांशु त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. कॉंग्रेस नेत्या सुप्रिया श्रिनेत यांनी सुधांशु त्रिवेदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

सुप्रिया श्रिनेत ट्विट करत म्हणाल्या, 'सुधांशु त्रिवेदी, हे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना वीर सावरकर यांच्यासोबत करत आहे. सुधांशु त्रिवेदी यांनी याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागितली पाहिजे, अन्यथा काँग्रेस पक्ष या प्रकारच्या कोणत्याही डिबेटमध्ये सहभागी होणार नाही, ज्या डिबेटमध्ये सुधांशु हे सहभागी असतील'.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com