Chandrashekhar Bawankule : 'बारामती शहरात प्यायला पाणी नाही'; चंद्रशेखर बावनकुळेंनी पवार कुटुंबाला डिवचलं

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पवार कुटुंबावर हल्लाबोल सुरुच आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSaam Tv

Chandrashekhar Bawankule News : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पवार कुटुंबावर हल्लाबोल सुरुच आहे. 'काही प्रमाणात सत्तेचा वापर केला, पण परंतु काही प्रमाणात ठेकेदारसाठी सत्तेचा वापर केला. बारामती शहरात पाणी नाहीये प्यायला. शहराचा विकास म्हणजे बारामतीचा विकास नव्हं, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवार कुटुंबावर केली. (Latest Marathi News)

Chandrashekhar Bawankule
Ajit Pawar: 'अडकवण्याचा प्रयत्न केला तर...'; अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच ठणकावलं

पुणे जिल्ह्यातील दौंड येथे महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. दौंड येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे आठवे प्रदर्शन आहे. आज पासून पाच दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना बावनकुळे यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ' शेतकऱ्यांकडून एकही रुपया न घेता हे कृषी प्रदर्शन आयोजित केल आहे. त्यासाठी वासुदेव काळे यांचे आभार मानण्यासाठी नागपूरातून आलो आहे. कमी कष्टात जास्त उत्पादन कसे मिळेल यासाठी प्रयत्नशील आहोत. जोपर्यंत नेता संवाद आणि प्रवास करीत नाही, तोपर्यंत तो नेता होत नाही'.

'जेव्हा आपण मोठ्या माणसांजवळ जातो, तेव्हा कधीतरी वाटतं हे किती गरीब आहेत. गरीब माणसे श्रीमंत वाटतात. कारण श्रीमंत लोक शेतकऱ्याच्या कृषी प्रदर्शनाला तिकीट ठेवतात, नाव न घेता बावनकुळे यांनी पवारांना टोला लगावला.

'नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांसाठी विनामूल्य प्रवेश ठेवत असतात. शेतकरी हा देशाला समृद्ध करू शकतो. G-20 परिषदेच्या माध्यामतून २९ देश भारतात येणार आहेत. हे डेलिगेशन पुण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांचे एक लाख उत्पन्न असेल ते 5 लाख कसे होईल हे G-20 परिषदेत मांडले जाणार आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, 'ते म्हणतात आम्ही विकास केला आम्ही विकास केला. विकास करून काय उपकार केले का? महाराष्ट्रातील 62 मधले 50 वर्ष सत्ता तुमच्या हातात होती. जनतेने मते दिली म्हणून तुम्ही निवडून आले. विकास करणे हे तुमची जबाबदारी आहे'.

'50 वर्षात काम केले तर उपकार काय केलं? काही प्रमाणात सत्तेचा वापर केला, पण परंतु काही प्रमाणात ठेकेदारसाठी सत्तेचा वापर केला. बारामती शहरात पाणी प्यायला नाहीये. शहराचा विकास म्हणजे बारामतीचा विकास नव्हं, असा टोला लगावत बावनकुळे यांनी पवार कुटुंबाला डिवचलं.

'मी बारामतीत गेलो होतो, तेव्हा मला निवेदन दिलं की कॅनॉलच्या अस्तरीकरनाचे काम थांबवा. कारोना काळात यांनी पूल बांधला आणि पाडला कुणाला माहितीही नाही. लस देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला जीव वाचवला. लशी इतर देशांना दिल्या. म्हणून नरेंद्र मोदींना लोक जगात मानतात, असे बावनकुळे पुढे म्हणाले .

'15 वर्ष सत्तेत असताना काम काय केलं? आता फडणवीस यांना काम सांगतात. ज्यांनी काम केलं नाही त्यांना गोळी मारा. गोळी मारा म्हणजे एके-47 नाही. त्यांचा कार्यक्रम करा. अमेठीत परिवर्तन झालं. आज अमेठीत हजारो कोटींची कामे झाली, असेही बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
Cabinet Decisions : महानगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढवली; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

'काही लोक केंद्राचा निधी घेतात आणि आम्ही केलं अस सांगतात. परिवर्तन हा नियम आहे. सत्तेपासून त्यांनी साधने निर्माण केली. पण आपण शेतकऱ्यांचा विकास करू. त्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढू. जे निवेदन येतील त्यावर काम करू. मागे निर्मला सीतारामन येऊन गेल्या, प्रल्हाद पटेल येऊन गेले. ते देखील दिलेल्या निवेदनवर काम करीत आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com