Maharashtra Political News : 'लोकांना टोमणे...'; उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीच भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांच्या सभेआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे.
Maharashtra Political News
Maharashtra Political News Saam tv

Chandrashekhar bawankule News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मालेगावात सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. 'लोकांना टीका टिपण्णी आवडत नाही. लोकांना टोमणे आवडत नाहीत. प्रश्न मांडायचे सोडून टोमणे सभा सुरू आहे, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बारामती तालुक्यातील सांगवीतील नीरा नदीची पाहणी केली. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'नीरा नदीमध्ये कारखान्याचे कत्तलखान्याचे दूषित पाणी सोडलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांनी निवेदन दिल्याने मी या नदीची पाहणी करण्यासाठी आलो होतो, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, 'काही दिवसांपूर्वी या भागातील शेतकऱ्यांची निवेदन मला आली होती. त्यांना सांगितलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर मी नदीची पाहणी करण्यासाठी येईल. शेतकऱ्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. कत्तलखाने कारखान्याचे पाणी नदीत सोडल्याने नदी दूषित झाली आहे. नदीचं पावित्र्य राखले गेले पाहिजे. त्यामुळे माझ्या परीने जे प्रयत्न करता येतील ते मी करेल'.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, 'आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही. माझ्या मतदार संघात 15 हजार मुस्लिम मतदार कमळावर मतदान करतात. उद्धव ठाकरे मालेगावला गेले आहेत. त्यांनी सभा घेतल्यानंतर आम्ही सभा घेऊ. पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. 1 लाख लोक येऊ नाहीतर 2 लाख लोक येऊ? आम्हाला काय करायचं आहे? आम्ही आमचे काम करीत राहू'.

Maharashtra Political News
K Chandrashekar Rao News: तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, मी भारताचा...

'लोक काम बघून मते देतील. हे डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळे आम्ही जनतेचे प्रश्न सोडवत आहोत आहेत त्यामुळे लोक आम्हाला मतदान करतील. लोकांना टीका टिपण्णी आवडत नाही. लोकांना टोमणे आवडत नाहीत. प्रश्न मांडायचे सोडून टोमणे सभा सुरू आहेत, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com