भाजपा प्रदेशाध्यक्षांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, मनातली भीती दिसू नये यासाठी मोठमोठ्याने...

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात अडीच वर्षे सूडभावनेने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला - बावनकुळे
Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule Vs Uddhav ThackeraySaam TV

सुशांत सावंत -

मुंबई: माझे कुटुंब माझी जबाबदारी, आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच राहणार नाही. चाळीस आमदार सोडून गेले. अजून जे काही राहिले आहेत, तेही जातील अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यांना ठाकरे परिवाराशिवाय कोणी दिसत नाही, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते आज नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. काल उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना भाजपवर सडकून टीका केली होती.

पाहा व्हिडीओ -

मेळाव्यात ठाकरे म्हणाले, कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय? कमळाबाई शब्द बाळासाहेबांचा आहे. मुंबईवर (Mumbai) हक्क सांगण्याचं धाडस करू नका. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिल्या ५ अग्रणी नेत्यांमध्ये माझे आजोबा होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा जनसंघाने समिती फोडली. ही त्यांची औलाद. ही नालायक माणसं आपण जोपासली, एवढे उपरे घेतलेत की बावनकुळे की एकशेबावन्न कुळे हेच कळत नाही असं म्हणत त्यांनी बावनकुळेंवर देखील टीका केली होती.

ठाकरेंच्या याच टीकेला आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बावनकुळे म्हणाले की, एखादा माणूस खूप घाबरला की, मनातली भीती दिसू नये यासाठी मोठमोठ्याने बोलतो. त्या पद्धतीने आपली भीती बाहेर दिसू नये यासाठी उद्धव ठाकरे अशी वक्तव्ये करत आहेत.

शिवाय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात अडीच वर्षे सूडभावनेने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. आजही ते सुधारलेले दिसत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारल्यामुळे अजूनही ते सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण फार काळ टिकणार नाही असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com