ठाकरे सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणांमुळे शिक्षणक्षेत्राची अधोगती; कल्याणमध्ये भाजपा शिक्षक आघाडीचे आंदोलन

शिक्षक भरती सुरू करण्यात यावी तसेच ठाणे जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवाव.
ठाकरे सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणांमुळे शिक्षणक्षेत्राची अधोगती; कल्याणमध्ये भाजपा शिक्षक आघाडीचे आंदोलन
ठाकरे सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणांमुळे शिक्षणक्षेत्राची अधोगती; कल्याणमध्ये भाजपा शिक्षक आघाडीचे आंदोलनप्रदीप भणगे

कल्याण : राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर, (Teachers) मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक व विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असून ठाकरे सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणांमुळे शिक्षणक्षेत्राची अधोगती होत असल्याचा आरोप माजी आमदार व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार (Narendra Pawar) यांनी आज कल्याण मध्ये केला. ते भारतीय जनता पार्टी कल्याण (Kalyan BJP) जिल्हा शिक्षक आघाडीने शिक्षणक्षेत्रातील मागण्यांसाठी कल्याण तहसील कार्यालयासमोर आयोजित केलेल्या आंदोलनात बोलत होते. (BJP teachers' front agitation in Kalyan)

हे देखील पहा-

शिक्षकांना वेळेवर १ तारखेला वेतन मिळावे, वरिष्ठ व निवडश्रेणी शिक्षकांचे प्रशिक्षण तातडीने आयोजित करण्यात यावे तसेच पी एफ,(PF) मेडिकल बिले(Medical Bill) त्वरित मंजूर करावी, शिक्षण सेवकांची ७ व्या वेतन आयोगप्रमाणे वाढ करण्यात यावी, जुनी पेंशन योजना सुरू करुन शिक्षक शिक्षकेतरांना त्रिस्तरीय १० २० ३० ची योजना लागू करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांना(Students) मोफत पाठ्यपुस्तके त्वरित देण्यात यावी आणि ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या मागण्यांसह शिक्षक भरती (Teacher recruitment) सुरू करण्यात यावी, ठाणे जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवावा, संस्थाचालकांना आर टी ई(RTE) प्रतिपूर्ती वेळेवर द्यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन कल्याण तहसिलदार व कल्याण शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आले.

ठाकरे सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणांमुळे शिक्षणक्षेत्राची अधोगती; कल्याणमध्ये भाजपा शिक्षक आघाडीचे आंदोलन
...तरच तुमचा भगवा खरा; संजय राऊतांचे भाजपाला आव्हान

दरम्यान या आंदोलनावेळी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, सहसंयोजक विकास पाटील, कोकण विभाग संयोजक एन एम भामरे, कार्यवाह विनोद शेलकर व कल्याण जिल्हा अध्यक्ष सुभाष सरोदे, ज्ञानेश्वर घुगे, अनिरुद्ध चव्हाण,प्रवीण सनेर, दिनेश भामरे, शरद शिंदे व इतर कार्यकर्ते शिक्षक उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com