Mumbai News: स्थायी समिती अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. पालिकेतील भारतीय जनता पक्ष स्थायी समिती अध्यक्ष यशवन्त जाधव यांच्या विरोधात हा ठराव मांडणार आहे
Mumbai News: स्थायी समिती अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव
Mumbai News: स्थायी समिती अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

मुंबई : मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. पालिकेतील भारतीय जनता पक्ष स्थायी समिती अध्यक्ष यशवन्त जाधव यांच्या विरोधात हा ठराव मांडणार आहे. (BJP to table no confidence motion against BMC Standing Committee Chief)

महापौर किशोरी पेडणेकर (Mayor) यांना भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीमधील भाजपच्या (Bharatiya Janata Party) सर्व सदस्यांच्या सह्या असणारं पत्र दिलं आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ३६ (ह) अन्वये महानगरपालिकेची (BMC) तातडीची सभा बोलविण्यात यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या पालिका महासभेच्या कामकाजात या ठरावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

अनेक प्रस्तावांमध्ये आर्थिक भ्रष्टाचार, कोविड काळातील गैरव्यवहार , खरेदीतील भ्रष्टाचार, सदस्यांना बोलू न देणे, घाईघाईत प्रस्ताव मंजूर करणे आदी कायदेविसंगत, अनियमितता आणि लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडवल्याचा आरोप करीत भाजप स्थायी समिती अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव भाजपा आणणार आहे.

Mumbai News: स्थायी समिती अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव
पुण्यात नवे निर्बंध? पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक

मुंबई महानगर पालिकेत भ्रष्टाचार वाढला असून कायदे , नियमांचे पालन न करता स्थायी समितीच कामकाज सुरू आहे . त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात अविश्‍वासाचा ठराव मांडण्यात आल्याचं शिंदे यांनी सांगितले. कोविड काळात महापालिका प्रशासनाला खर्चाचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. मात्र,या खर्चाचे माहिती 15 दिवसात स्थायी समिती पुढे सादर करणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात काही महिन्यांनंतर ही माहिती सादर केली जाते असा भाजपचा आरोप आहे.

''आता शालेय विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी केले जात आहेत. त्या खरेदीबाबतची माहिती अपूर्ण दिली असून तसेच २०२७ मध्ये झालेल्या खरेदी पेक्षा दुप्पट दराने ही टॅब खरेदी होत आहे . त्याच बरोबर कोणतेही कंत्राट ठराविक कंत्राटदारांना वारंवार मिळू नये ,त्यासाठी वर्तमानपत्र,संकेत स्थळावर जाहीरात द्याव्यात असा नियम आहे. हे नियमही पाळले जात नाहीत.अशा अनेक मुद्द्यांवरुन प्रशासन भ्रष्टाचार करत असून त्यांत सत्ताधारी म्हणून शिवसेनाही सहभागी आहे.त्यामुळे हा अविश्‍वासाचा ठराव मांडण्यात आला आहे,'' असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले .

भाजपच्या स्थायी समिती सदस्यांनी जरी अविश्वास ठरावासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र दिलं असलं तरीही या समिती मधील पालिकेच्या विरोधी पक्ष नेते, काँग्रेस, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही .

या विषयी स्थायी समिती अध्यक्षांना विचारलं असता त्यांनी अविश्वास ठराव मांडणे विरोधकांचा अधिकार असल्याचं म्हटले आहे. तसेच भाजपा विकास कामाला खीळ बसवू पाहते आहे. त्यामुळे वारंवार प्रस्तावाला विरोध करणे, सभेत गोंधळ घालणे , प्रस्तावाला उपसूचना मांडणे असे प्रकार करत असल्याचं स्थायी समिती अध्यक्षांनी म्हटले आहे.

Edited By- Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com