शिवसेनेने मनानुसार प्रभागरचना केल्याचा भाजपचा आरोप; प्रभागरचने विरोधात BJP कोर्टात जाणार

याआधी देखील गणेश नाईक यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा शिवसेना मनासारखे प्रभागरचना तयार करत आहे असा आरोप केला होता.
शिवसेनेने मनानुसार प्रभागरचना केल्याचा भाजपचा आरोप; प्रभागरचने विरोधात BJP कोर्टात जाणार
शिवसेनेने मनानुसार प्रभागरचना केल्याचा भाजपचा आरोप; प्रभागरचने विरोधात BJP कोर्टात जाणार Saam TV

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation) सार्वत्रिक निवडणूक 2022 करीता प्रारूप प्रभागांचा नकाशा आणि भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना राज्य निवडणूक आयोग (State Election Commission) यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात येत आहे. सध्या नवी मुंबई महानगरपालिकेत 111 वरून 122 नगरसेवक वाढणार आहेत.

मात्र, याबाबत भाजपा निवडणूक आयोगाने केलेल्या प्रभाग रचनेविरोधात कोर्टात जाणार आहे. शिवसेनेचे (Shivsena) आपल्या मनानुसार वार्ड रचना केली आहे. तसेच नवी मुंबईतील काही ठिकाणी वार्ड रचना चुकीच्या पद्धतीने केली आहे या रचना मध्ये नागरिकांच्या गैरसोयी करण्यात आले काही ठिकाणी सेनेसाठी छोटे वार्ड करण्यात आले आहेत असा आरोप भाजपने केले आहे.

शिवसेनेने मनानुसार प्रभागरचना केल्याचा भाजपचा आरोप; प्रभागरचने विरोधात BJP कोर्टात जाणार
Amrita Fadnavis : महाविकास आघाडी नव्हे; "महा-गोंधळलेलं" सरकार - अमृता फडणवीस

याआधी देखील गणेश नाईक यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा शिवसेना मनासारखे वार्ड रचना तयार करत आहे असा आरोप केला होता.

दरम्यान, आज मुंबईतील 2022 वॉर्ड रचनेचा आराखडा देखील 227 वरून आता 236 प्रभाग होणार आहे. अधिकृत वॉर्ड घोषित केले जाणार असून शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला चेंबूर गोवंडीत प्रभाग वाढणार प्रभाग वाढीचा हा आराखडा पालिकेच्या संकेतस्थळावर आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध केला जाणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com