भाजपचा सभांचा सपाटा सुरुच; मुंबईत १५ तारखेला देवेंद्र फडणवीस काय बोलणार?

१५ मे रोजी भाजपने सभेचे आयोजन केले आहे. ही सभा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam TV

मुंबईत: शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय सभा होतं आहेत. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपने (BJP) बुस्टर सभा घेतली होती. आता पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांची तोफ धडाडणार आहे. १५ मे रोजी भाजपने सभेचे आयोजन केले आहे. ही सभा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार असल्याचे भाजपकडून (BJP) सांगण्यात येत आहे.

१४ मे रोजी शिवसेनेकडून (Shivsena) मुंबईत सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बोलणार आहेत. या सभेच्या दुसऱ्याच दिवशी भाजपने सभेचे आयोजन केले आहे. मुंबईत भाजपची या महिन्यातील दुसरी मोठी सभा असणार आहे. उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांच्याकडून या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis
राज ठाकरे हे बाळासाहेबांची कॉपी करू शकत नाही; रामदास आठवलेंचा टोला

एमएमआरमधील उत्तर भारतीय मोर्चाचे कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांची हिंदुत्ववादी भूमिका आणि उत्तर भारतीय मुद्द्यावर फडणवीस भाष्य करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र भाजपने राज ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. पण काल उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागण्याची मागणी केली होती. यापार्श्वभूमीवर ही सभा होणार असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील पाहा

१ मे रोजी भाजपने (BJP) मुंबईत सभा घेवून शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका केली होती. ही सभा बुस्टर सभा असल्याचे भाजपने म्हटले होते. तर औरंगाबादमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली होती. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर या सभा सुरु असल्याच्या बोलले जात आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com