"मी पुन्हा येईन"ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजप वेट अ‍ॅन्ड वॉचच्या भूमिकेत

Political Crisis In Maharashtra : मागची चूक पुन्हा होऊ नये म्हणून यावेळी सर्व गोष्टी योग्य त्या पद्धतीने पार पडल्यावरच भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचालींना सुरवात करण्यात येणार आहे.
"मी पुन्हा येईन"ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजप वेट अ‍ॅन्ड वॉचच्या भूमिकेत
bjp will wait and watch in political crisis maharashtra eknath shindeSaam Tv

सुशांत सावंत

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री नगरविकास एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या बंडाची सर्वाधिक झळ शिवसेनेला बसल्याचे सध्या तरी चित्र दिसत असल्याचे बोलले जाते. शिंदे यांच्यासह ३३ आमदार गुवाहटीत गेले असल्याची माहिती आहे, यात शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढत आहे. आज आणखी दोन आमदार गुवाहटीसाठी निघाले आहेत. या सगळ्या राजकीय उलाढालीत सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष भाजप (BJP) अजूनही वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहे. बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाने मविआचा पाठींबा काढल्याशिवाय भाजप गडबड करणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज एकनाथ शिंदे गट मविआ सरकारसोबत पाठींबा काढत असल्याचे पत्र राज्यपालांना देण्याची शक्यता आहे. असं झाल्यानंतरच भाजप पुढच्या हालचाली करणार आहे. मागची चूक पुन्हा होऊ नये म्हणून यावेळी सर्व गोष्टी योग्य त्या पद्धतीने पार पडल्यावरच भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचालींना सुरवात करण्यात येणार आहे. (Eknath Shinde latest News)

हे देखील पाहा -

शिंदे यांच्यासह ३३ आमदार गुवाहटीत गेले असल्याची माहिती आहे, यात शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढत आहे. आज आणखी दोन आमदार गुवाहटीसाठी निघाले आहेत. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सारवणकर गुवाहाटीसाठी निघाले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गोटातील आमदारांची संख्या वाढत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र सध्या एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेचे जवळपास ३५ आमदार झाले आहेत, तर एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे संख्याबळापेक्षाही जास्त आमदार असल्याचा दावा केला आहे. या सगळ्यात भाजप मात्र वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे सर्वात जास्त आमदार असूनही भाजपला ८० तासांच सत्तेतून बाहेर व्हावं लागलं होतं, तसं आता काही होऊ नये म्हणून भाजप सावधगिरीने पावलं उचलत आहे.

bjp will wait and watch in political crisis maharashtra eknath shinde
'हे वादळ दोन दिवसात शांत होईल, सरकार पडणार नाही; आमदारही परत येतील'

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वात जास्त १०५ आमदार निवडून आणले. मात्र शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करत सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी भरपूर गाजला होता. मात्र सत्तास्थापनेसाठी आमदारांचे बहुमत निर्माण करण्यासाठी साफ अपयशी ठरल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अवघ्या ८० तासांत कोसळले होते. महाराष्ट्राच्या संसदीय राजकारणाच्या इतिहासात स्पष्ट बहुमताअभावी अत्यंत कमी दिवसांचे सरकार म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुसऱ्या राजवटीची नोंद इतिहासात झाली. यावेळी असं काही होऊ नये तसेच एक मजबूत आणि स्थिर सरकार स्थापन व्हावं यासाठी भाजप सर्व विचार करुनच पावलं उचलणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com