बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यात 'मविआ' सरकार अपयशी; भाजप महिला मोर्चाचा आरोप

बलात्काऱ्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यात 'मविआ' सरकार अपयशी; भाजप महिला मोर्चाचा आरोप
बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यात 'मविआ' सरकार अपयशी; भाजप महिला मोर्चाचा आरोपगोपाल मोटघरे

पुणे : राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या बलात्कारासारख्या घटनांच्या विरोधात आज पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले. पिंपरीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) स्मारक चौकात बलात्काऱ्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. (BJP women activists staged agitation)

हे देखील पहा-

बलात्काऱ्यांना (Rapist) कठोर कायदेशीर शिक्षा देण्यासाठी देशात शक्ती आणि दिशा सारखे कायदे करण्यात आले असले तरी देखील महाविकास आघाडी सरकारला राज्यात बलात्काराच्या घटनांना आळा घालता येत नाहीये असा आरोप यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी या आंदोलनावेळी केला आहे.

बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यात 'मविआ' सरकार अपयशी; भाजप महिला मोर्चाचा आरोप
'भटके विमुक्त' खात्याच 'बहुजन विकास' नामांतराला माझा विरोध - संजय राठोड (पहा व्हिडिओ)

दिवसेंदिवस राज्यात बलात्काराच्या घटना वाढत आहेत. वानवडी पोसिल ठाण्याच्या हद्दीत झालेला सामुहिक बलात्कार आणि परवाचा साकिनाका येथील काळीज पिळवटून टाकणारा प्रकार खरोखर महाराष्ट्राला शरमेन मान खाली घालायला लावणारा आहे. या घटनामुळे राज्यातील सर्वच नागरिकांमध्ये रोष आहे आणि या घटना घडू नयेत यासाठी शासणाने आता कठोरात कठोर शिक्षा या आरोपींना कारायला हवी अशी भावना तयार झाली आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com