
दिवा : दिवा (Diva) येथील आगासन गावातील रेल्वे थांबा तातडीने सुरू करावा तसेच दिवा स्थानकात सरकते जिने, पूर्वेला आरक्षण केंद्र आणि तिकीट घर मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या दिव्यातील पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सर्व प्रश्नांवर सकारात्मक विचार केला जाईल असे दानवे यांनी सांगितले, तसेच आपण लवकरच दिवा स्थानकाचा दौरा करू असे आश्वासन दिले. (BJP Workers from Diva met Raosaheb Danve on various railway issues)
हे देखील पाहा -
दिव्यातील भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन दिवा स्थानकातील समस्या मांडल्या. आगासन स्थानकात थांबा सुरू झाल्यास तेथील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, कामगार वर्गाला येण्या-जाण्यासाठी सुविधा होईल, याबाबत सविस्तर माहिती दिली. दिवा स्टेशन येथे सरकता जिना तातडीने तयार करावा अशी मागणी यावेळी केली. दिवा पूर्वेला तिकीट घर आणि आरक्षण केंद्र मिळावे अशी मागणी यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळाने केली. यावेळी रावसाहेब दानवे यांना निवेदन देण्यात आले. जेष्ठ पदाधिकारी शिवाजी आव्हाड, दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, विजय भोईर गणेश, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, रोशन भगत आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.