
सुशांत सावंत
मुंबई : राज्यसभा निवडणुकीची मतदान (Voting) प्रक्रिया पूर्ण झाली आहे.राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) आज ३.३० वाजेपर्यंत विधानसभेच्या २८५ सदस्यांनी मतदान केले आहे. शिवसेना आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणीला पाच वाजता सुरुवात होणार होती. मात्र, अद्याप मतमोजणीला सुरुवात झाली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर मतमोजणीला सुरुवात होईल. मात्र, आयोगाने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे जोवर परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही. (Rajya Sabha Election voting News)
आज मतदानावेळी भाजपचे (BJP) पोलिंग एजंट पराग अळवणी यांनी जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मतं बाद करण्याची मागणी केली . भाजपने आतापर्यंत तीन मतांवर आक्षेप घेतला आहे. भाजपने आक्षेप घेतलेल्या मतांमध्ये सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या नावाचा सामावेश आहे.त्यानंतर भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून जितेंद्र आव्हाड ,यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांची मते करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावरही आक्षेप घेतला आहे.
या सर्व आक्षेपानंतर काही आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवले. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीत चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तपासासाठी मतदान केंद्रावरील चित्रीकरण मागवले आहेत. चित्रीकरणाची पाहणी केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग मतमोजणीला परवानगी देणार आहे. दरम्यान, शिवसेना (Shivsena) देखील केंद्रीय निवडणूक आयोग पत्र पाठवणार आहेत. काँग्रेसचे (Congress) शिष्टमंडळ देखील केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्लीत भेटण्यासाठी गेले आहेत.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने दिलेलं स्पष्टिकरण योग्य आहे की नाही यावर विचार करून निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात येणार आहे. केंद्रातील या बैठकीमुळे मतमोजणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
Edited By - Vishal Gangurde
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.