'RSS'च्या इशाऱ्यावर चालणाऱ्या भाजपची विचारधाराच आरक्षण विरोधी - नाना पटोले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी.
'RSS'च्या इशाऱ्यावर चालणाऱ्या भाजपची विचारधाराच आरक्षण विरोधी - नाना पटोले
'RSS'च्या इशाऱ्यावर चालणाऱ्या भाजपची विचारधाराच आरक्षण विरोधी - नाना पटोलेSaamTV

मुंबई : आज संपुर्ण राज्यभर ओबीसी (OBC) आरक्षणावरून (Reservation) भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी (MVA Goverment) सरकारच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केली आहेत. भाजपच्या याच आंदोलनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष हा 'आरएसएस'च्या इशाऱ्यावरती चालतो आणि भाजपची विचारधाराच मुळी आरक्षणाविरोधातील आहे अशा शब्दांत नाना पटोलेंनी भाजपच्या आजच्या आंदोलनावरती टीका केली आहे. (BJP's ideology is anti-reservation-nana Patole)

हे देखील पहा-

महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ओबीसी आरक्षण गेलं असल्याचा आरोप भाजपकडून सतत करण्यात येत आहे. अशातच आता निवडणूक आयोगाने (Election Commission) ओबीसी समाजाच्या आरक्षणाशिवाय निवडणूका (Elections) घेण्याचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे भाजपला राज्य सरकारला घेरण्यासाठी चांगलीच संधी मिळाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर भाजपकडून संपुर्ण राज्यभर आज राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केली जात आहेत.

'RSS'च्या इशाऱ्यावर चालणाऱ्या भाजपची विचारधाराच आरक्षण विरोधी - नाना पटोले
OBC आरक्षणासंदर्भात 'भाजपा' फक्त राजकारण करत आहे; रोहीत पवारांचा आरोप

मात्र 'भाजप पक्ष हा केवळ नौटंकी करत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे दोघेच ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत'. त्यामुळे भाजपने यांच्या विरोधात आंदोलन करावी आणि राज्य सरकारच्या विरोधातील आंदोलनाची नौटंकी बंद करावी असा घणाघातच नाना पटोलेंनी भाजपवरती केला आहे.

दरम्यान केंद्र सरकारकडे जातनिहाय जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी आहे ती या न्यायालयीन लढाईत कामाला येणार आहे मात्र केंद्र सरकार ती माहिती राज्य सरकारला द्यायला तयार नाही. इम्पीरिकल डेटा मागितला तरी तो देत नाही हा डेटा देणं ते सतत टाळत असल्याचा आरोपही पटोलेंनी यावेळी केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com