मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवाचं फडकणार: प्रविण दरेकर

१ मे महाराष्ट्र दिनी आज भारतीय जनता पार्टीकडून मुंबईत बुस्टर डोस सभा होत आहे.
Pravin Darekar
Pravin Darekar Saam Tv

मुंबई: मुंबई महापालिकेवर भाजपचा (BJP) भगवाच फडकणार असल्याचा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी व्यक्त केला. १ मे महाराष्ट्र दिनी आज भारतीय जनता पार्टीकडून मुंबईत बुस्टर डोस सभा होत आहे. या सभेत विरोधी पक्षनेते दरेकर यांनी शिवसेनेवर (Shivsena) टीका केली.

मुंबईत बुस्टर डोस सभेचं आयोजन करण्यात आले आहे. ही सभा मुंबईच्या सोमय्या मैदानावर होत आहे. मेट्रो कारशेड प्रकल्पापासून ते राज्यातील विविध घोटाळ्यांबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) बोलणार असल्याचे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

Pravin Darekar
Raj Thackeray : राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलची आणि ताफ्यातील गाड्यांची तपासणी

'२७ वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेनेची (Shivsena) सत्ता आहे, त्याचा भाजपकडून (BJP) हिशोब पोलखोलवर घेतला जात आहे. मुंबईकर या सभेसाठी उत्सुक आहेत. देवेंद्र फडणवीस पोलखोल याची करणार आहेत, असंही दरेकर म्हणाले.

मराठी माणसाचं नावं घ्यायचं, मराठी शाळा बंद पड आहेत. उर्दु शाळा वाढत आहेत. ज्या मराठी माणसाने २७ वर्ष सत्ता दिली, त्यांना रहायला घरं मिळत नाही. आता मुंबईकरांना भाजपवर विश्वास आहे. मुंबईची पोलखोल सुरु झाली, आमच्या गाड्यांवर दगडफेक झाली तरीही आम्ही पोलखोल यात्रा सुरुच ठेवली आहे. आज महाराष्ट्र दिन आहे, कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा भागवा फडकवणार, असंही प्रविण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com