'भाजपचा प्रदेशाध्यक्ष मुंबईपुरता मर्यादीत नसावा'; आशिष शेलारांना अंतर्गत विरोध?

भाजपमध्ये आता प्रदेशाध्यक्ष पदावरुन चर्चा सुरु झाली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा कार्यकाळ संपत आहे.
'भाजपचा प्रदेशाध्यक्ष मुंबईपुरता मर्यादीत नसावा'; आशिष शेलारांना अंतर्गत विरोध?
ashish shelarSaam Tv

सुशांत सावंत

मुंबई: भाजपमध्ये आता प्रदेशाध्यक्ष पदावरुन चर्चा सुरु झाली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे आता भाजपचा (BJP) नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेल्या आशिष शेलारांना (Ashish Shelar) भाजपमध्ये अंतर्गत विरोध होत असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. फक्त मुंबई पुरता मर्यादित असलेला प्रदेशाध्यक्ष नको असा सूर भाजपच्या गोटात आहे. भाजपच्या काही नेत्यांनी फडणवीस यांना याबाबत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता ओबीसी नेत्याची प्रदेशाध्यक्ष पदी निवड करावी असे भाजपच्या काही नेत्यांनी सांगितले आहे.

ashish shelar
उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याची लंका जळू शकते - किरीट सोमय्या

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आशिष शेलार यांच्याकडे पालिका निवडणुकीच्या तोंडावर जबाबदारी दिल्याने काही नेते आधीच नाराज होते. त्यात आता शेलार प्रदेशाध्यक्ष पदासाठी लॉबिंग करत असल्याने भाजपच्या काही ग्रामीण भागातील नेत्यांनी विरोध केल्याची सूत्रांची माहिती आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या प्रदेश अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपत असून, आतापासूनच भाजपमध्ये या पदासाठी लॉबिंग सुरू आहे. यामध्ये सर्वात पुढे आशिष शेलार असल्याने ते जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र त्यांच्या नावालाच भाजपमधील काही नेत्यांचा विरोध असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजपने जोरदार प्रचार सुरु केला आहे. काल मुंबईत भाजपची बुस्टर सभा पार पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सभेला संबोधीत केले. यासभेमध्ये त्यांनी शिवसेनेवरती सडकून टीका केली. आता आगमी विधानसभा निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता भाजपचे पुढील प्रदेशाध्यक्ष कोण असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.