Blade Attack: लोकलमध्ये घुसून तरुणीवर ब्लेड हल्ला, चर्नी रोड रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये घुसून तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीये
Blade Attack: लोकलमध्ये घुसून तरुणीवर ब्लेड हल्ला, चर्नी रोड रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना
Blade AttackSaam Tv

मुंबई: मुंबईत दिवसेंदिवस महिलांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये घुसून तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीये (Blade Attack On Girl In Local At Charni Road Railway Station).

Blade Attack
Crime: तंबाखुला लावण्यासाठी चुना मागितल्यावरुन कोल्हापुरात खून

चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर तरुणीवर ब्लेडने हल्ला (Attack) करण्यात आला आहे.महिला डब्यात घुसून या तरुणीवर आरोपीने हल्ला केलाय.या घटनेत तरुणी थोडक्यात बचावली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजता घडलीये. घटना घटनेवेळी रेल्वे डब्यात सुरक्षा रक्षक नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

पाहा व्हिडीओ-

याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुये. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीये. आरोपीने महिला डब्यात घुसून तरुणीवर हल्ला केल्याने महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com