नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी ब्लोअर ब्लास्टिंग, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे काम अतिशय वेगात सुरु आहे. मात्र कामाचा हा वेग रहिवाश्याना धडकी भरवणारा आहे.
Navi Mumabi Airport News
Navi Mumabi Airport NewsSaam Tv

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News : नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी ब्लोअर ब्लास्टिंग करण्यात येतंय. मात्र या ब्लास्टिंगची तीव्रता अधिक असल्याने याचा त्रास आजूबाजूला असणाऱ्या नागरि वस्तीला होतोय.नवी मुंबई (Navi Mumbai) आंतराष्ट्रीय विमानतळाचे (Airport) काम अतिशय वेगात सुरु आहे. मात्र कामाचा हा वेग रहिवाश्याना धडकी भरवणारा आहे.

Navi Mumabi Airport News
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! अंधेरी पूर्व - पश्चिमेला जोडणारा गोखले ब्रिज वाहतुकीसाठी बंद

कारण लवकर सपाटीकरणाचे काम पूर्ण व्हावे यासाठी सिडको व संबंधित कंपनी मोठ्या प्रमाणात ब्लोअर ब्लास्टिंग करत असून यामुळे विमानतळ क्षेत्राच्या आजूबाजूला असणारे आदिवासी पाडे, गाव तसेच बेलापूर विभागाला देखील हादरे बसत आहेत. या हादऱ्यांमुळे अनेक घरांना तडे गेलेत, अनेक घरांच्या काचा फुटल्यात तर अनेक इमारती राहण्यासाठी धोकादायक झाल्यात यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेय.

सिडकोच्या मनमानी कारभारा विरोधात वहाळ ग्राम पंचायत आक्रमक झालेय. ब्लोअर ब्लास्टिंग मुळे रहिवाशी चिंतेत असून यासंदर्भात सर्व संबंधित विभागाना पत्र व्यवहार करण्यात आले असून ब्लोअर ब्लास्टिंगची तीव्रता कमी न झाल्यास विमानतळाचे काम बंद आंदोलन करू असा इशारा यावेळी वहाळ ग्रामपंचायत सरपंच पूजा पाटील तसेच शेकाप नेते राजेंद्र पाटील यांनी दिलाय.

विमानतळासाठी 10 गावांचे पुनर्वसन करण्यात आले असून ब्लास्टिंगच्या कामामुळे अनेक गावात भीतीचे वातावरण पसरलंय, विकासाला विरोध नसला तरी नागरिकांना होणारा त्रास दुर्लक्षित करून चालणार नाही हे अधोरेखित करणे महत्वाचे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com