Mumbai Road News : मुंबईचे रस्ते होणार चकाचक; डेडलाइन ठरली, थेट आदेश निघाले

Mumbai Road Maintenance Work : मान्सूनपूर्व मुंबईतील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करा, असे आदेश मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.
Mumbai Road Maintenance Work
Mumbai Road Maintenance WorkSaam TV

Mumbai Road Maintenance Work : मान्सूनपूर्व मुंबईतील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करा, असे आदेश मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व मुंबईतील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल ८४ कोटी रुपयांचा निधी दिली आहे.

मुंबईत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे पडलेले चित्र पाहायला मिळतं. अगदी पहिल्या पावसानंतरच अनेक ठिकाणी रस्त्यांवरती खड्डे पडतात. त्यामुळे मुंबईतील खराब रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे.(Latest Marathi News)

Mumbai Road Maintenance Work
Mumbai Crime News: मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीच्या नावाखाली तरुणाची लाखोंची फसवणूक, एकाला अटक

रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई महापालिकेच्या २४ वॉर्डांमध्ये निधी वाटपाचं काम करण्यात आले असून, तातडीने मान्सूनपूर्व रस्ते दुरुस्तीची कामे मुंबई महापालिकेकडून केली जाणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी ८४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई शहरासाठी २७ कोटी, पश्चिम उपनगरांसाठी ३९ कोटी, तर पूर्व उपनगरांसाठी १८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Mumbai Road Maintenance Work
Sharad Pawar Mango : सोलापुरात आला 'शरद आंबा', पवारांचं नाव आंब्याला का दिलं? शेतकऱ्याने सांगितलं कारण...

सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांनी रस्त्यांवरील खराब पॅचेस ओळखावेत आणि रोड सेंट्रल एजन्सीच्या कार्यकारी अभियंत्यांना नियुक्त एजन्सीद्वारे ते पूर्ण करण्यास सांगावे, असे निर्देश मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारसू यांच्याकडून देण्यात आले आहेत.

शिवाय, वाटप केलेल्या निधीचे प्रमाण हे प्रभाग कार्यालयांच्या मागणीपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त खर्च करू नये आणि जर जास्त प्रमाणात आवश्यक असेल तर फाइलमध्ये पूर्व मंजुरी घेणे अधिकाऱ्यांना आवश्यक असणार आहे.

१५ जूनपूर्वी ३० दिवसांच्या आत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यास अधिकाऱ्यांन सांगण्यात आले आहे, कारण निविदांची कामाची वैधता केवळ ४५ दिवसांची असणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com