Iqbal Singh Chahal : ईडी चौकशीनंतर बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

इक्बाल सिंह हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले. ईडीच्या सव्वा तासाच्या चौकशीनंतर इक्बाल सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Iqbal Singh Chahal
Iqbal Singh Chahal Saam Tv

Iqbal Singh Chahal News : कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना समन्स बजावण्यात आले होते. ईडीने इक्बाल सिंह चहल यांना सोमवारी चौकशीसाठी बोलाविले होते. त्यानुसार, इक्बाल सिंह हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले. ईडीच्या सव्वा तासाच्या चौकशीनंतर इक्बाल सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

Iqbal Singh Chahal
Graduate Constituency Election : पक्ष सांगेल त्याचे काम करणार ! भाजप नेत्याची पदवीधर निवडणुकीतून माघार

बीएमसी (BMC) आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal ) म्हणाले, जून २०२० मध्ये कोविड आल्यानंतर वेळीच उपाय योजना केली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. त्यानंतर राज्य सरकारच्या सूचनेनंतर आम्ही मोकळ्या मैदानात जम्बो कोविड सेंटर सुरू केले'.

'विविध ठिकाणच्या मोकळ्या जागा घेतल्या त्याचे काम आम्ही संबधित रुग्णालयालाही दिले. मात्र तिथे आम्हाला मनुष्य बळाची कमतरता जाणवली. त्यावेळी कोविड रुग्णालयात जिथे सर्व आमचं आहे. तिथे आम्ही कोटेशन घेऊन चार पार्टींना आऊट सोर्सिंगचं काम दिलं, असे चहल पुढे म्हणाले.

Iqbal Singh Chahal
Mumbai Weather News : मुंबई गारठली, येत्या तीन दिवसांत राज्यातील तापमानात होणार आणखी घट

'लाखो लोकांना वेळीच उपचार मिळाले. त्यांचे जीव वाचले. या चार पार्टीचं काम फक्त आम्हाला डाॅक्टर आणि कर्मचारी पुरवण्याचं होतं. त्यानुसार दिवसाचे त्यांना पैसे देण्याचं ठरवण्यात आलं. मात्र यात काहींनी बनावट कागदपत्र सादर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्ही पोलिसांना पत्र लिहून त्याची शहानिशा करावी असे कळवले, असेही चहल पुढे म्हणाले.

'तसेच पालिकेतर्फे आम्ही सर्व सहकार्य करण्याचे आता ईडीला कळवले आहे. पून्हा चौकशीला बोलावल्यास पून्हा सहकार्य करू, असे चहल यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com