BMC : मुंबई महापालिका आरक्षणाची सोडत जाहीर;'या' माजी नगरसेवकांना गमवावे लागले वार्ड

मुंबई महानगर पालिका (BMC ) निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आरक्षणाची सोडत जाहीर केली आहे
BMC
BMC Saam tv

मुंबई : मुंबई महानगर पालिका (BMC ) निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर केली आहे. मात्र, तरीही अनेक राजकीय पक्षांनी ओबीसी उमेदवारांसाठी काही जागा सोडण्याचे जाहीर केले आहे. मुंबई महापालिकेत वर्षानुवर्षे निवडून येणाऱ्या प्रस्थापित नगरसेवकांना या प्रभाग आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे. त्यामुळे या माजी नगरसेवकांना आता निवडणुकीसाठी नवे प्रभाग शोधावे लागणार आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभाग आरक्षण सोडत जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर झाल्याने लवकरच निवडणुकांची (BMC Election ) रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. (BMC Election Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची प्रभाग आरक्षण सोडत आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात आली. निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर केल्याने पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेता रवी राजा , शिवसेना माजी नगरसेवक अमेय घोले , भाजपचे माजी गट नेते प्रभाकर शिंदे यांचे वार्ड देखील महिला आरक्षित झाले आहेत. त्यामुळे या माजी नगरसेवकांना निवडणुकीसाठी नवे प्रभाग शोधावे लागणार आहे . मुंबई महापालिकेची आरक्षणाची सोडत जाहीर होताच माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पेडणेकर म्हणाले, 'आरक्षण ही निवणुकीची प्रक्रिया आहे. जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे. शिवसेना पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो आम्हाला अंतिम असेल'. 'पूर्ण मुंबईत आम्ही शिवसेनेचे आम्ही शिवसेनेचे उमेदवार निवडून देऊ आणि पुन्हा एकदा भगवा फडकवणार आहोत', असा विश्वास पेडणेकर यांनी व्यक्त केला.

BMC
सावधान! तुमच्या खिशात नकली नोटा? बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट; पाहा RBI चा अहवाल

दरम्यान, भाजप नेते भालचंद्र शिरसाट मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर प्रतिक्रिया देताना म्हणाले,'आम्ही प्रभाग आरक्षण सोडतीनुसार निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. भाजप मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. हे दुर्दैव आहे परंतु आम्ही ओबीसी आरक्षण राजकीय आणि शासकीय नसले तरी पक्षाकडून देणार आहोत', असे शिरसाट यांनी सांगितले.

अनुसुचित जातींसाठी राखीव असलेले वॉर्ड

अनुसुचित जातीसाठी राखीव प्रभाग असलेले प्रभाग : ६०, १५३,१५७,१६२,२०८,२१५,२२१

अनुसुचित जाती महिला : ८५,१०७,११९,१३९,१६५,१९०,१९४,२०४

अनुसुचित जमाती : ५५

अनुसुचित जमाती महिला : १२४

सर्वसाधारण महिला : प्राधान्य क्रं. १ ) : २,१०, २१, २२, २३, २५, ३३, ३४, ४९, ५२, ५४, ५७, ५९, ६१, ८९, ९०, ९५, ९८, १००, १०४, १०६, १०९, १११, ११८, १२१, १२२, १३४, १४४, १४५, १५०, १५६, १५९, १६९, १७०, १७१, १७२, १७५, १७८, १८२, १८४, १८९, १९१, १९२, २०१, २०२, २०५, २०७, २१२, २१३, २१८, २२९, २३०, २३६

प्राधान्य क्रं. २) - ५, २८, २९, ३९, ४५, ४६, ६४, ६७, ६९, ७४, ८०, ९२, १०३, १२०, १२५, १३१, १४२, १४७, १५१, १६३, १६८, १७७, १८१, १८६, १८७, १९६, २२०, २२५, २२६, २२७, २३१, २३३, २३४

सर्वसाधारण : १, ३, ४, ६, ७, ८, १२, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २०, २४, २६, २७, ३०, ३१, ३२, ३५, ३६, ३७, ३८, ४०, ४१, ४२, ४३, ४७, ४८, ५१, ५६, ५८, ६२, ६३, ६५, ६६, ६८, ७०, ७१, ७२, ७३ , ७६, ७७, ७८, ८२, ८३, ८४, ८७, ८९, ९१, ९३, ९४, ९७, १०१, १९५, १०८, ११०, ११२, ११३, ११४, ११५, ११६, ११७, १२३, १२६, १२७, १२८, १२९, १३२, १३३, १३५, १३६, १३८, १४०, १४१, १४३, १४९, १५२, १५८, १६१, १६४, १६६, १६७, १७३, १७४, १७६, १७९, १८०, १८३, १९३, १९५,१९७, १९८, १९९, २००, २०३, २०६, २०९, २१०, २११, २१४, २१६, २१९, २२२, २२३, २२४, २२८, २३५

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com