कितीही काळी मांजरे, कोल्हे आणि लांडगे आले तरीही वाघासमोर काही चालत नाही: संजय राऊत

कितीही प्रयत्न केले तरी शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवरून खाली उतरवणे त्यांना शक्य होणार नाही असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
कितीही काळी मांजरे, कोल्हे आणि लांडगे आले तरीही वाघासमोर काही चालत नाही: संजय राऊत
संजय राऊतSaamTvnews

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. शिवसेनेने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. काल विक्रोळीतील छत्रपती संभाजी महाराज मैदानाचा लोकपर्ण सोहळा आयोजित करण्यात आला.

हे देखील पहा :

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार बॅटींग करत विरोधकांचा समाचार घेतला आहे. काळी मांजरे, कोल्हे लांडगे कितीही आले पण, वाघासमोर काही चालत का ? कितीही प्रयत्न केले तरी शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवरून खाली उतरवणे त्यांना शक्य होणार नाही असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com