तुमच्या घरावर हातोडा का टाकू नये? राणा दाम्पत्याला BMCची नोटीस

मुंबई महापालिकने राणा दाम्पत्याला आणखी एक नोटीस पाठवली असून ही कारणे दाखवा नोटीस आहे.
Navneet Rana Ravi Rana
Navneet Rana Ravi RanaSaam TV

मुंबई : मुंबई महापालिकने (BMC) राणा दाम्पत्याला आणखी एक नोटीस पाठवली असून ही कारणे दाखवा नोटीस आहे. राणा यांनी घरातील बेकायदा बांधकाम का तोडू नये ? याची कारणं ७ दिवसांमध्ये द्यावी अन्यथा बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करणारच ही भूमिका घेतल्याने राणा दाम्पत्यावर तुरुंगवास झाला. त्यानंतर राणा दाम्पत्य जामीनावर बाहेर आलं. मात्र, तुरुंगातून बाहेर आले तरी राणा यांच्या अडचणींमध्ये काही कमी होताना दिसतं नाही. एकीकडे सरकारी वकीलांनी नवनीत राणा यांनी जामीन मंजूर करतानाच्या अटी शर्तींचे पालन केलं नसल्यांने त्यांचा जामीन रद्द करावा ही विनंती न्यायालयाकडे केली असतानाच राणा यांच्या मुंबईतील घरावर आता महानगरपालिकेकडून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Navneet Rana Ravi Rana
उद्धव ठाकरे, तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत : राज ठाकरे

मुंबईच्या खार परिसरात नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana)यांचं घर असून या घरामध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप पालिकेने केला आहे. शिवाय या कामाची पाहणी पालिका अधाकाऱ्यांनी केली असून आता आणखी एक कारणे द्या नोटीस पालिकेने राणा यांना पाठवली आहे. यामध्ये आपलं बेकायदा बांधकाम का पाडू नये याची कारणं ७ दिवसांच्या आत पालिकेला द्यावी, अन्यथा या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणार असा इशारा पालिकेने दिला आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणा हा वाद काही केल्या कमी होत नाहीच, उलट तो दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

पालिकेने दिलेल्या बांधकामाची यादी -

EE(BP) प्लॅन u/no द्वारे मंजूर केलेल्या विद्यमान फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम. CE/1664/WS/AH d.09 03/2007

व्हॉइड साइड लिफ्ट फ्लॅटमध्ये विलीन झाली आणि टॉयलेटमध्ये रूपांतरित झाली .adm-1.65m x 1.65m

2) पूजा खोली स्वयंपाकघरात विलीन झाली आणि संपूर्ण लिव्हिंग रूममध्ये बदलली.

3) लॉबी क्षेत्र हे निवासी क्षेत्र adm-1.5m x 1.65m मध्ये विलीन केलीय

4) उतार असलेले छप्पर सपाट केले आहे आणि संलग्न बेडरूममध्ये विलीन केले आहे. adm-2.3m x 3.65m

5)स्लोपिंग छताच्या बाजूला शून्य (वक्र) बाल्कनीमध्ये रूपांतरित, adm-14.5 चौ.मी.

6) लिव्हिंग रूमचे उप स्वयंपाकघर आणि बेड रूममध्ये विभागलेले आहे.

7) बाल्कनी बेडरूम आणि किचनसह संलग्न, adm- 20.16 sqm.

8) दक्षिण पश्चिम बाजूला शौचालय आणि बेडरूम adm-1.65m x 5.2m मध्ये विलीन झाले.

9)एलिव्हेशन प्रोजेक्शन शेजारील बेडरूम आणि लिव्हिंग रूम adm-15.21 sqm सह विलीन केले.

10) पश्चिमेकडील दोन शयनकक्ष एकत्र केले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com