Mumbai: पालिकेतर्फे येत्या महिन्यात सुरु होणार २५ 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे'

Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Health Center In Mumbai: केईएम, लोकमान्य टिळक, नायर, कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील विशेष आणि अतिविशेष तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला टेलिमेडिसीनच्या माध्यमातून घेण्याची सुविधाही 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रात' असणार आहे.
Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Health Center In Mumbai: 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र'
Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Health Center In Mumbai: 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र' Saam TV

मुंबई: मुंबईतील वेगवेगळ्या भागत येत्या महिन्यात जवळपास २५ 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र' (Hinduhridaysamrat Balasaheb thackeray Health Care Center) सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यादृष्टीने पालिकेचे (BMC) प्रयत्न सुरु आहेत. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ही केंद्र सुरू राहणार आहेत. ही केंद्र सुरू करण्यासाठी शहरातील २५ दवाखान्यांची निवड करण्यात आली असून या केंद्रांमुळे त्यांचा दर्जा सध्या उंचावला जाणार आहे. सध्या आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जात असून, माफक दरात चाचण्या करता याव्यात यासाठी निविदा मागवून प्रयोगशाळांचीही निवड केली जाणार आहे. (Mumbai Municipal Corporation to start 25 'Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray Health Centers' next month)

हे देखील पहा -

या आरोग्य केंद्रामध्ये एक डॉक्टर, परिचारिका कक्ष, तपासणी कक्ष, प्रतीक्षालय आणि औषधालय यांचा समावेश असेल. एका केंद्रामध्ये १३९ प्रकारच्या रक्त आणि इतर चाचण्या उपलब्ध असणार आहेत. क्ष-किरण, सीटी स्कॅन, मॅमोग्राफी इत्यादी चाचण्याही अगदी माफक शुल्कामध्ये उपलब्ध करण्यात येतील, तसेच शहरात अशा १०० आरोग्य केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. केईएम, लोकमान्य टिळक, नायर, कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील विशेष आणि अतिविशेष तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला टेलिमेडिसीनच्या माध्यमातून घेण्याची सुविधाही असणार आहे.

Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Health Center In Mumbai: 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र'
Money Laundering Case: मनी लाँड्रिंग प्रकरणात साक्षीदार होण्यास सचिन वाझे तयार, देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार?

याशिवाय कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग इत्यादी आजारांचे निदान वेळेत करण्यासाठी तपासणी कार्यक्रमही राबविण्यात येतील. या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पामध्ये भांडवली खर्चाकरिता २५० कोटी रुपये तर महसुली खर्चासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या आरोग्य केंद्रांमुळे मुंबईकरांना (Mumbai) माफक दरांत आरोग्यसेवा मिळणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com