अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी BMC ची विशेष मोहिम

अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन एक नवी मोहिम आखण्याच्या तयारीत आहे.
अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी BMC ची विशेष मोहिम
अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी BMC ची विशेष मोहिमSaam Tv News

मुंबई - अंथरुणास खिळून bedridden असलेल्या नागरिकांचे कोविड लसीकरण covid vaccination करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन एक नवी मोहिम special campaign आखण्याच्या तयारीत आहे. जे नागरिक आजारपणासह शारीरिक किंवा अन्य वैद्यकिय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा व्यक्तींचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने माहिती मागवली आहे.आजारपणासह शारीरिक किंवा अन्य वैद्यकिय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, असे अनेक नागरिक आहेत. अश्या व्यक्तींना कोविड लस देता यावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. BMC's special campaign for covid vaccination of bedridden citizens

हे देखील पहा -

त्यादृष्टीने, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे सर्व मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, ज्यांच्या घरात अंथरुणास खिळून असणारे bedridden व्यक्ती आहेत आणि ज्यांना अशा व्यक्तींचे कोविड लसीकरण करुन घ्यायचे आहे, अशा व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती covidvacc2bedridden@gmail.com या ईमेल आयडीवर पाठविण्यात यावी. जेणेकरून अशा व्यक्तींचे कोविड लसीकरण करणे सोईचे जाईल, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com