Ambernath Crime: परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; 5 जणांना ठोकल्या बेड्या

अंबरनाथमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा ठाणे गुन्हे शाखेने धाड टाकत पर्दाफाश केला आहे.
Ambernath Crime
Ambernath CrimeSaam Tv

Ambernath Crime News: अंबरनाथमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा ठाणे गुन्हे शाखेने धाड टाकत पर्दाफाश केला आहे. या धाडीत पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अंबरनाथ पश्चिमेच्या ग्लोब बिझनेस पार्क या इमारतीत हे बोगस कॉल सेंटर सुरू होतं. या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या २३३ नंबरच्या युनिटमध्ये हे बोगस कॉल सेंटर सुरू करण्यात आलं होतं. (Latest Marathi News)

Ambernath Crime
Nashik Rasta Roko Andolan News : सरकारचं डाेकं ठिकाणावर आणणार ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राेखली केळझर फाट्यावरील वाहतुक

या कॉल सेंटरमधून (Call Centre) परदेशातील नागरिकांना आपण एक्सफिनिटी कंपनीतून बोलत असल्याचं सांगत त्यांना इंटरनेट सेवा ऑफर, तसंच बक्षीसांची आमिषं दाखवली जायची. त्यानंतर त्यांच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स मिळवून त्यांच्या बँक खात्यातून पैसे परस्पर काढले जायचे. याबाबत ठाणे (Thane) गुन्हे शाखेला माहिती मिळताच त्यांनी या कॉल सेंटरवर धाड टाकली.

या ठिकाणी परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ॲलेक्स डेव्हिड बासरी, मिल्टन मेल्विन मंतेरो, श्रीकांत जयप्रकाश पवार, आकाश विनोद ठाकूर आणि पंकज रतनसिंह गौड या पाच जणांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर फसवणुकीसह कट रचणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यासह इंडियन टेलिग्राफ अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Ambernath Crime
Gondia Crime News: बाप-लेकांनी केली युवकाची हत्या; शेतात गुरे चारण्यास नेल्‍याचा होता जुना वाद

या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यांचा ताबा सध्या गुन्हे शाखेकडेच आहे. त्यांच्या या बोगस कॉल सेंटरमधून किती लोकांची फसवणूक करण्यात आली आहे, तसंच त्यांनी लाटलेली रक्कम नेमकी किती आहे? या सगळ्या बाबी आता गुन्हे शाखेच्या तपासात समोर येणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com