मुंबईत बोगस वॅक्सिनेशनचा सुळसुळाट

परळच्या पोद्दार सेंटर मध्ये आता नव्याने सहा जणांच्या टोळीने बोगस लसीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
मुंबईत बोगस वॅक्सिनेशनचा सुळसुळाट
मुंबईत बोगस वॅक्सिनेशनचा सुळसुळाट- सूरज सावंत

मुंबई : बोगस वॅक्सिनेशन Vaccination केल्या प्रकरणी कांदिवली, वर्सोवा, खार आणि बोरिवली Borlvali पोलिस Police ठाण्यात गुन्ह्यांची नोंद असून या चारही ठिकाणी एकाच टोळीने हे कृत्य केले होते. मात्र, परळच्या Parel पोद्दार सेंटर मध्ये आता नव्याने सहा जणांच्या टोळीने बोगस लसीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. New Case Surfaced of Bogus Vaccination in Mumbai

हे देखिल पहा

या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात महेंद्र सिंग, श्रीकांत माने, सिमा सिंग व इतर तीन आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे.या तिघांनी 28 मे ते 29 मे या दरम्यान डाॅक्टर असल्याचे भासवून परळच्या पोद्दार सेंटर मध्ये लसीकरण कँम्पचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी पोदार सेंटरच्या 207 कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले. तर या लसीकरणानंतर आरोपींनी नानावटी व लाईफ लाईन केअर हाँस्पिटलच्या नावाने बोगस प्रमाणपत्रही देत या कर्मचाऱ्यांकडून तब्बल 2 लाख 44 हजार 800 रुपये उकळले. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मुंबईत बोगस वॅक्सिनेशनचा सुळसुळाट
सिडको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सज्ज

दरम्यान मुंबईत बोगस लसीकरण कँम्पच्या नावाखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी नेस्को सेंटर मध्ये काम करणाऱ्या एका कर्मचारी महिलेला अटक केली आहे. ही महिला नेस्को कोविड सेंटर मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत असून ही या प्रकरणातील सहावी अटक आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री ही कारवाई केली असून गुडिया यादव असे या आरोपीचे नाव आहे. गुडियाने नेस्को कोविड सेंटरच्या कोवान अॅप्लिकेशनचा युजरनेम आणि पासवर्ड चोरी केला होता. हा युजर नेम आणि पासवर्ड नेस्को सेंटरचा असून तो गुन्ह्यात वापरला गेल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.

Edited By- Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com