MNS New Song: मनसेच्या नव्या गाण्यावर थिरकला Ranveer Singh? व्हायरल झालेल्या 2 व्हिडिओतून सत्य काय ते कळेल?

MNS News Song : अवधूत गुप्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे गाणं मनसेच्या मंचावर सादर केलं.
Ranveer Singh
Ranveer Singh Saam TV

MNS News Song : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा काल पार पडला. याच मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरण्यासाठी पक्षानं नवं गाणं रिलीज केलं आहे. राज ठाकरे  आणि मनसे यांच्यावर आधारित हे गाणं आहे. अवधूत गुप्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे गाणं मनसेच्या मंचावर सादर केलं.

प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा , नवनिर्माण घडवूया असे या गाण्याचे बोल आहेत. सभेला उपस्थित कार्यकर्त्यांनी गाण्याला उत्फुर्त दादही दिली. 'राष्ट्रवादी पुन्हा..' आणि शिवसेनेच्या गाण्यानंतर मनसेचं नवं गाणंही लोकांच्या पसंतीस उतरताना आता दिसतंय. (Maharashtra Breaking News)

Ranveer Singh
Raj Thackeray : राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा; काय आहे नेमकं १५ वर्षांपूर्वीचं प्रकरण?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मनसेचं नवं गाणं ऐकताना दिसत आहे. रणवीर त्याच्या अलिशान निळ्या रंगाच्या मर्सिडीस मेबॅक जीएलएस 600 कारमधून जाताना दिसत आहे.

एका सिग्नलवर त्याची कार थांबते. त्यावेळी मनसेचे नवं गाणं वाजताना दिसतंय. त्यावेळी रणवीर गाडीतच थिरकतना दिसत आहे आणि त्याचा मोबाईल बाहेर दाखवताना दिसत आहे. त्यामुळे रणवीरही राज ठाकरे आणि मनसचेच्या नव्या गाण्याच्या प्रेमात पडल्याची चर्चा होऊ लागलीय.

Ranveer Singh
Rahul Gandhi Convicted: मोठी बातमी! राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा; मोदी आडनावाबद्दल 'ते' वक्तव्य भोवलं

पण जरा थोडं थांबा. कारण रणवीरचा व्हायरल झालेल्या व्हिडीओ जुनाच आहे. आणि त्यात तो मनसेच्या नाहीतर त्याच्याच 'सर्कस' सिनेमातील 'कंरट लगा रे...' गाण्यावर थिरकताना दिसतं आहे. त्यामुळे मनसेच्या गाण्यावर रणवीर थिरकतानाचा व्हिडीओ मॉर्फ असल्याचं सिद्ध झालंय. मात्र मनसेचं नवं गाणं कुणालाही थिरकायला लावणारं आहे. त्यामुळे कमी वेळेत सोशल मीडियावर हे गाणं धुमाकूळ घालेल अशी अपेक्षा आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com