Mumbai Dyeing Land Deal : मुबंईच्या इतिहासातील सर्वात मोठा जमीन व्यवहार, बॉम्बे डाइंग 22 एकरचा भूखंड 5200 कोटींना विकणार

Bombay Dyeing Worli Property : वरळीतील या भूखंडाच्या विक्रीतून बॉम्बे डाईंगला ५२०० कोटी रुपये मिळणार आहेत.
Mumbai Dyeing Land Deal
Mumbai Dyeing Land DealSaam Tv

Mumbai Biggest Land Deal :

मुंबईत जमिनींना सोन्याचा नाहीतर, हिऱ्यांचा भाव आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ड्रीम सिटी मुंबईतील जमिनींच्या किमतीचा अंदाज नुकत्याच झालेल्या एका व्यवहारातून तुम्हाला येईल. बॉम्बे डाइंगने मुबंईच्या इतिहासातील सर्वात मोठा जमीन व्यवहार केला आहे . वरळीतील आपली जमीन बॉम्बे डाइंड जपानच्या सुमितोमो रिएल्टी अँड डेव्हलपमेंट कंपनीला विकणार आहे.

वरळीतील या भूखंडाच्या विक्रीतून बॉम्बे डाईंगला ५२०० कोटी रुपये मिळणार आहेत. वाडिया ग्रुपच्या बॉम्बे डाईंगने गुरूवारी आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

Mumbai Dyeing Land Deal
Gold Silver Rate (14th September): सुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या वाढत्या दराला ब्रेक, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

करारानुसार, सुमितोमोची उपकंपनी (Company) गोइसू या डीलसाठी दोन टप्प्यांत पैसे देणार आहे.निवेदनानुसार बॉम्बे डाइंगच्या संचालक मंडळाची बुधवारी या कराराला मंजुरी देण्यासाठी बैठक झाली. हा करार आता शेअर होल्डरच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यांच्या मंजुरीनंतर हा करार पूर्ण करण्याच्या दिशेने पावले उचलली जातील.

बॉम्बे डाइंग या करारातून मिळालेला पैसा (Money) कर्ज (Loan) फेडण्यासाठी आणि भविष्यातील प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी वापरेल. या बातमीमुळे गुरूवारी बॉम्बे डाइंगच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली होती.

Mumbai Dyeing Land Deal
WhatsApp Channel Features Roll Out : WhatsApp चं भन्नाट फीचर! एका क्लिकवर मिळणार जगभरातील घडामोडी, लगेच अपडेट करा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com