
Sameer Wankhede Latest News : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे.
अटकेपासून संरक्षण देताना न्यायालयाने त्यांच्यासमोर काही अटीही ठेवल्या आहेत. त्या म्हणजे त्यांना यापुढे आर्यन खान प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्हॉट्सअप चॅट व्हायरल करता येणार नाही.
समीर वानखेडे याची अटकेपासून संरक्षण याचिका केली होती. याबद्दल न्यायालयात युक्तिवाद करताना वानखेडे यांचे वकील म्हणाले की, ''हे सर्व एका चांगल्या अधिकार्याला हैराण करण्यासाठी सुरू आहे. त्यांना अंधारात ठेऊन, समीर यांनी आर्यन खान प्रकरणात काहीही केलं नाही.''
सीबीआयचाने काय केला युक्तीवाद?
याचिकेविरोधात युक्तीवाद करताना न्यायालयात सीबीआयचे वकील वकील कुलदीप म्हणाले की, समीर वानखेडे यांची चौकशी अद्याप अपूर्ण आहे. अद्याप काही महत्वाचा खुलासा वानखेडे करायला तयार नाही. चौकशीतील महत्वाचा भाग मी डिस्क्लोज करू शकत नाही. शाहरुख खान सोबत केलेला संवाद त्यांनी खुला केला. हे सरकारी नौकरी नियमांचं उल्लंघन आहे. (Latest Marathi News)
न्यायालयाने वानखेडेंवर घातल्या 'या' अटी
आर्यन खान प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्हाट्स अप चॅट व्हायरल करता येणार नाही.
माध्यमांशी संवाद साधण्यावर बंदी.
समीर वानखेडे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी सीबीआयने वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कट आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानसोबत केलेल्या कथित चॅट समोर आली. आर्यन खान प्रकरणात न्यायालयाने सीबीआयला 3 जूनपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ८ जून रोजी होणार आहे.
दरम्यान, समीर वानखेडेंनी दावा केला आहे की, 'अतीक अहमदसारखा माझ्यावर देखील हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मला सुरक्षा देण्यात यावी.' हल्ला होण्याची भीती व्यक्त करत समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. प्रयागराजमध्ये कुख्यात गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची पत्रकाराच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजच्या बाहेर 15 एप्रिलला ही घटना घडली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.