
मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाची संधी मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) धाव घेतलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दाेन्ही नेत्यांची मुंबई उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) मागणी फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील (mva) माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांना विधान परिषद निवडणुकीत (mlc election) यांना मतदान करता येणार नाही हे निश्चित झाले आहे. (mlc election latest marathi news)
विधान परिषदेच्या निवडणुकीत (mlc election) मतदानाची संधी मिळावी यासाठी ईडीच्या काेठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी सोमवारी एक दिवसाच्या जातमुचलक्यावर सोडण्याची विनंती करणारा अंतरिम अर्ज मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) दाखल केला हाेता.
न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात देशमुख यांनी सकाळी ९ ते ६ या वेळेत विधानभवनात एस्कॉर्टमध्ये जाऊन मतदान करण्याची परवानगी मागितली आहे. गुरुवारी देशमुख यांच्या अर्जावर त्यांच्या वकीलांनी जाेरदार युक्तीवाद केला हाेता. त्यानंतर न्यायाधिशांनी उद्या (म्हणजे आज निकाल देण्यात येईल) असे स्पष्ट केले हाेते.
न्यायमुर्ती एन. जे. जमादार यांनी कैद्यांना मतदानाचा अधिकार नसल्याने देशमुख आणि मलिक यांचा मतदानाचा हक्क नाकारला. दरम्यान गत आठवड्यातच विशेष पीएमएलए न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी तात्पुरती मुक्तता करण्याबाबत मागणी केली हाेती. संबंधित परवानगीचा अर्ज न्यायालयाने नाकारला हाेता.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.