Mumbai Crime News : पवई आयआयटीच्या NRI टॉपरचा लॅपटॉप लंपास; पोलिसांनी अवघ्या २ तासात चोराच्या मुसक्या आवळल्या

पवई आयआयटीचा 30 वर्षापूर्वी टॉपर माजी विद्यार्थी असलेल्या एनआरआय भारतीय नागरिकास दोन चोरांनी चांगलाच हात दाखवला
Mumbai Crime News
Mumbai Crime News Saam Tv

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबईच्या पवई आयआयटीमध्ये व्याख्यानासाठी आलेल्या आणि पवई आयआयटीचा 30 वर्षापूर्वी टॉपर माजी विद्यार्थी असलेल्या एनआरआय भारतीय नागरिकास दोन चोरांनी चांगलाच हात दाखवला. त्याच्याकडील लॅपटॉप आणि मोबाईल असलेली बॅग चोरटयांनी लांबवली. मात्र मुंबईच्या बोरीवली रेल्वे पोलिसांनी अवघ्या दोन तासातच या दोन्ही चोरांना ताब्यात घेतले. (Latest Marathi News)

Mumbai Crime News
Pune Crime News: कोयता गँगचा धुडगूस कायमचा बंद?; कोयते पुरवणाऱ्यांचाच केला बंदोबस्त

बोरिवली रेल्वे पोलिसांनी त्याच्यांकडून लॅपटॉप आणि मोबाईल असलेली बॅग जप्त करून या अमेरिकन (NRI) नागरिकाला दिलासा दिला. मोहम्मद अर्शद मोहम्मद आझाद (२१ वर्षे), मोहम्मद इस्लाम इद्रीस (२४ वर्षे) अशी अटक आरोपींची नावे आहेत

पवई IIT मधील टॉपरला 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पवई IIT तर्फे त्यांचे लेक्चर आणि गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी पवई आयआयटीने आपल्या सर्व माजी टॉपरसला बोलावले होते. त्यांचे इथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले होते. यात बाल गोविंद शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते.

कार्यक्रमाला जाण्यासाठी बाल गोविंद शर्मा हे बोरिवली स्थानकात पोहोचले, तेव्हा आराम करण्यासाठी रेल्वे वेटींग रुममध्ये थांबले. त्याचवेळी या चोरट्यांनी चोरटयांनी त्यांची बॅग लंपास केली.यासंदर्भात त्याने वेळीच बोरिवली रेल्वे पोलिसांना तक्रार दिली.यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला

Mumbai Crime News
Nashik Crime News : युवकाचा रात्रभर अपंग वृद्ध महिलेवर अत्याचार, नाशिक शहरात उमटले पडसाद

बोरिवली जीआरपीचे पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले की, अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणारे ६० वर्षीय बाल गोविंद शर्मा ३० वर्षांपूर्वी पवई आयआयटीमध्ये टॉपर होते, त्यानंतर अमेरिकन सरकारने त्यांना अमेरिकेत बोलावले आणि नागरिकत्व दिले.

पोलिसांनी सांगितले की, तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या दोन तासांत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून अमेरिकेतून आलेल्या बाल गोविंद शर्मा यांचा लॅपटॉप परत केला, लॅपटॉपशिवाय त्यांचा मोबाईल फोनही बॅगेत होता, जो पोलिसांनी जप्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com