Ulhasnagar : दहा हजाराचा हप्ता दिला नाही म्हणून बियर आणि कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या घरावर फेकल्या!

उल्हासनगरात गावगुंडांचा हैदोस, दहा हजाराचा हप्ता दिला नाही म्हणून बियर आणि कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या ने केला घरावर हल्ला केल्याप्रकरणी मुख्य आरोपी नवीन केशवानीसह 5 जणांवर विठ्ठलवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ulhasnagar : दहा हजाराचा हप्ता दिला नाही म्हणून बियर आणि कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या घरावर फेकल्या!
Ulhasnagar : दहा हजाराचा हप्ता दिला नाही म्हणून बियर आणि कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या घरावर फेकल्या!अजय दुधाणे

उल्हासनगर : महिन्याला दहा हजाराचा हप्ता नाही दिला म्हणून एका व्यापाऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली, इतकेच नव्हे तर व्यापाऱ्याचा घरावर बियर आणि कोल्ड्रिंक्सच्या भरलेल्या बॉटल ने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे.

हे देखील पहा :

धीरज वलेचा असे व्यापाऱ्याचे नाव असून उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथे त्यांचे किराणामालाचे दुकान आहे. याच परिसरात नवीन केशवानी हा गावगुंड राहतो, तू धंद्यात खूप पैसे कमावतो, मला दर महिना दहा हजार हप्ता द्यायचा असा या गावगुंडानी धीरज यांनी दम दिला. मात्र, धीरज यांनी हप्ता द्यायला नकार दिला, म्हणून आरोपी नवीन केशवानी याला राग आला आणि आपल्या सोबत आजून चार आरोपींना घेऊन धीरज यांच्या घरावर बियर आणि कोल्ड्रिंक्स च्या भरलेल्या बाटल्या ने हल्ला चढवला.

Ulhasnagar : दहा हजाराचा हप्ता दिला नाही म्हणून बियर आणि कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या घरावर फेकल्या!
Gauri Ganpati : चक्क सुनांना बनवलं गौराई!
Ulhasnagar : दहा हजाराचा हप्ता दिला नाही म्हणून बियर आणि कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या घरावर फेकल्या!
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच
Ulhasnagar : दहा हजाराचा हप्ता दिला नाही म्हणून बियर आणि कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या घरावर फेकल्या!
Crime : प्रेमात धोका दिल्याने महिलेने केली प्रियकराची साखरपुड्या दिवशी हत्या!

या हल्ल्यात कोणी जखमी झाले नसून हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र, घटनेनंतर व्यापारी वालेचा हे घाबरले असून सराईत गुन्हेगार नवीन केशवानीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेनंतर नवीन केशवानी व त्याच्या साथीदाराविरोधात विठ्ठलवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सीसीटीव्ही च्या आधारे आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी.डी.टेळे यांनी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com