Mumbai Bike Stunt Video: मुलींना घेऊन जीवघेणा बाईक स्टंट, हिरोगिरी करणाऱ्या तरुणाला अखेर अटक

Bike Stunt: या जीवघेण्या बाईक स्टंट व्हिडिओने (Bike Stunt Video) सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.
Mumbai Bike Stunt
Mumbai Bike Stunt Saam TV

Mumbai Crime News: मुंबईतल्या रस्त्यावर दोन तरुणींना बाईकवर बसवून फिल्मी स्टाईल स्टंट (Mumbai Bike Stunt) करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या जीवघेण्या बाईक स्टंट व्हिडिओने (Bike Stunt Video) सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या व्हायरल व्हिडिओनंतर बाईक स्टंट करणाऱ्या तरुणासह दोन तरुणींविरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडून या तिघांचा शोध सुरु होता. अखेर या हिरोगिरी करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Mumbai Bike Stunt
Sarpanch Pravin Gopale News : सर्वांत माेठी बातमी; राष्ट्रवादीच्या सरपंचाच्या खून प्रकरणी चाैघे पाेलिसांच्या ताब्यात

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैय्याज अहमद आजीमुल्ला कादरी (२४ वर्षे) असं बाईक स्टंट करणाऱ्या आरोपी तरुणाचे नाव आहे. या तरुणाला बाईकसह अटक करण्यात आली आहे. या तरुणाविरोधात याआधीच अनेक गंभीर प्रकरणात मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. अॅन्टॉप हिल आणि वडाळा पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल असून त्याच्याविरोधात तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली असल्याची माहिती समोर आली.

आरोपी फैय्याज हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे सतत त्याचे ठिकाण बदल होता. अखेर पोलिसांनी टेक्नॉलॉजीचा वापर करत आरोपीचा शोध घेतला. आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना तो साकीनाका परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत आरोपीला बाईकसह अटक केली.

Mumbai Bike Stunt
Video: बाईक स्टंट करणं तिघांना पडलं महागात, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ होतोय व्हायरल!

तीन दिवसांपूर्वी @PatholeWarriors या ट्वीटर अकाऊंटवरुन आरोपी फैय्याजचा बाईक स्टंटचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये फैय्याज दोन तरुणींना आपल्या बाईकवर बसवून जीवघेणा स्टंट करत असल्याचे दिसून आले होते. हा बाईक स्टंट करत तो वाहतूक नियमांची अक्षरश: पायमल्ली करत असल्याचे निदर्शनास आले होते. हा व्हिडिओ वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील रस्त्यावरचा (Bandra Kurla Complex) असल्याची माहिती समोर आली होती.

त्यानंतर, बीकेसी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी फैय्याजसह दोन तरुणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता 114, 279, 336 आणि 34 आणि मोटार वाहन कायद्याचे कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु करत अवघ्या काही तासांमध्येच त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Edited By - Priya Vijay More

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com