शोना बाबूसाठी प्रियकराने केली आईची हत्या

प्रेमात आड येणाऱ्या अल्पवयीन प्रेयसीच्या आईची प्रियकराने हत्या केल्याची, धक्कादायक घटना टिटवळा या ठिकाणी घडली आहे.
शोना बाबूसाठी प्रियकराने केली आईची हत्या
शोना बाबूसाठी प्रियकराने केली आईची हत्याSaam Tv

टिटवाळा : प्रेमात Love आड येणाऱ्या अल्पवयीन प्रेयसीच्या Beloved आईची प्रियकराने हत्या केल्याची, धक्कादायक घटना टिटवाळा Titwala या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी आरोपी समीर दळवी याला टिटवाळा पोलिसांनी Police अटक Arrested केली आहे. 

टिटवाळा येथील इंदारनगर Indarnagar परिसरात सोनी देवराज शेरवे ही (वय- 39) वर्षाची महिला तिच्या कुटुंबासोबत राहत होती.सोनी ही महापालिकेत कंत्राटी कामगार होती. 4 जुलै दिवशी सोनीने आपल्या सावत्र मुलगी हिला फोन करुन सांगितले की गुरवली येथील मी फळे घेण्यासाठी जात आहे. तोपर्यंत घरात लक्ष ठेव. संध्याकाळी चार वाजेर्पयत सोनीचा मोबाईल सुरु होता.

हे देखील पहा-

मात्र, त्यानंतर तिचा मोबाईल स्वीच ऑफ झाला. ही बाब मुलीने त्यांच्या नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर टिटवाळा पोलिस ठाण्यात सोनी ही बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. टिटवाळा पोलिसानी Police शोध चालू केले. या दरम्यान तिचा मृतदेह गुरवली Gurvali परिसरात मिळून आला आहे. मृतदेह सडला होता. याबाबत टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू वंजारी यांनी या प्रकरणाचा तपासाकरिता काही पथके नेमली आहेत.

सोनी हिच्या संपर्कात असलेल्या सर्व नातेवाईकांची पोलिसांनी विचारपूस केली. यादरम्यान पोलिसांना माहिती पडले की, सोनीची सावत्र मुलगी आणि समीर यांच्यात प्रेम संबंध आहेत. काही दिवसापूर्वीच मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी समीर सोबत सोनीचे भांडण झाले होते. सोनी हिने समीरला सांगितले होती की, तुझी लायकी नाही.

शोना बाबूसाठी प्रियकराने केली आईची हत्या
प्रियकराने काढला प्रेयसी काटा; १० वर्षांनी हत्येचा उलगडा

तुझ्याशी माझ्या मुलीचे लग्न करणार नाही, असा दम दिला होता. तपास अधिकारी विजय सूव्रे यांनी तपासाची सूत्रे फिरवून, समीर याला ताब्यात घेत विचारपूस केली असता, समीर याने केलेला गुन्हा कबूल केले आहे. ज्या दिवशी सोनी ही गुरवलीच्या जंगलात गेली होती. मुलीने ही गोष्ट समीरला सांगितली होती. समीर याने तिचा फायदा घेतला आहे. समीरने सोनीला जंगलात एकटे गाठले, आणि गळा दाबून तिची हत्या केली आहे. समीर याला अटक करण्यात आले आहे. आता पोलिस पुढील तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com