Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणावा; अंबादास दानवेंचे उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र

Shivsena News: विरोधकांचा उल्लेख देशद्रोही असा केल्यानं हक्कभंग आणण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांची केली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Saam tv

>> निवृत्ती बाबर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानेव यांनी केली आहे. अंबादास दानवे यांनी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांना याबाबत पत्र देखील लिहिलं आहे. विरोधकांचा उल्लेख देशद्रोही असा केल्यानं हक्कभंग आणण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांची केली आहे.

आंबादास दानवे यांनी पत्रात म्हटलं की, मी महाराष्ट्र विधानपरिषद नियम २४९ अन्वये महानगर माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याविरुद खालीलप्रमाणे विशेषाधिकारभंगाची सूचना देत आहे. रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी शासनाने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमास विरोधी पक्षांनी शेतकरी, विद्यार्थ्याचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा या विषयावरून बहिष्कार घातला होता. (Political News)

Eknath Shinde
Nana Patole : संजय राऊत यांच्या विधीमंडळावरील विधानावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले,' त्यांचे वक्तव्य...'

या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकार परिषदेत देशद्रोह्यांबरोबर चहापान टळले असे वक्तव्य केले आहे. राज्याच्या प्रमुख पदी असलेल्या लोकप्रतिनिधींनी अशा हीन भाषेचा वापर केल्यामुळे विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद म्हणून माझा व सार्वभौम सभागृहाचा विशेषाधिकार भंग व अवमान झाला आहे.

Eknath Shinde
Bhaskar Jadhav : त्या बिचा-याचा कंडाेम केला यांनी...भास्कर जाधवांचा Video Viral

हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे विरुद्ध मी हक्कभंगाचा प्रस्ताव देत आहे. कृपया सदरहू प्रस्ताव स्वीकृत करुन पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी विधानपरिषद विशेष हक्कभंग समितीकडे पाठवावे, अशी आपणांस विनंती आहे, असं दानवे यांनी पत्रात लिहिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com