Breaking: पुण्यात पुन्हा एकदा MPSCच्या उमेदवाराची आत्महत्या! (पहा Video)

अमर पीएसआय फिजिकल ची तयारी करत होता.
अमर मोहिते
अमर मोहितेगोपाल मोटघरे

गोपाल मोटघरे

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा MPSCच्या उमेदवाराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमर मोहिते (वय 33) असे आत्महत्या केलेल्या उमेदवाराचे नाव आहे. 2010 पासून पुण्यातील नवीपेठेतील विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे असलेल्या वस्ती ग्रहात राहून एमपीएससीचे शिक्षण घेत होता.

रात्री उशिरा झोपलेल्या अमरने सकाळी आपल्या मित्रांना प्रतिसाद न दिल्यामुळे मित्रांनी दरवाजा तोडून वस्तीगृहात प्रवेश केल्यानंतर अमरने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचं समोर आलं. तर, विश्रामबागवाडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

अमर मोहिते
Beed Crime News: दोन भावांमध्ये पाण्यावरुन हाणामारी; एका भावाचा महिन्यानंतर मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, अमर मूळचा सांगली चा रहिवाशी असून तो पाटील सदाशिव पेठ येथील हॉस्टेल मध्ये राहत होता. पूण्यात तो पीएसआय फिजिकलची तयारी करत होता.

पहा व्हिडीओ-

अमरच्या आत्महत्येचे कारण मराठा आरक्षण रद्द झाल्या मुळे PSI Physical मधून बाहेर पडला त्याचा धक्का अमरला सहन झाला नाही म्हणून नैराश्यातून त्याने आत्महत्या केली आहे असे प्राथमिक माहितीनुसार सांगण्यात येत आहे. तर, अमर मोहीतेने सदाशिव पेठेतील राहत्या ठिकाणी आत्महत्या केली आहे.

दरम्यान, याआधी स्वप्नील लोणकर (दौंड), मल्हारी बारवकर(दौंड), वैभव विष्णू विरकल (औरंगाबाद), महेश लक्ष्मण झोरे (ता. 28 नोव्हेंबर 2020) या MPSCच्या उमेदवारांनी आत्महत्या केल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com