Breaking News: महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात 7 ते 8 श्रीसदस्यांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

Maharashtra Bhushan Puraskar Sohala News: अत्यवस्थ श्री सदस्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
7 to 8 Shrisadasas die in Maharashtra Bhushan award ceremony
7 to 8 Shrisadasas die in Maharashtra Bhushan award ceremonysaam tv

Maharashtra Bhushan Puraskar Sohala News: महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात 7 ते 8 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून शेकडो श्री सदस्य अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. अत्यवस्थ सदस्यांवर कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन अत्यवस्थ रुग्णांची विचारपूस केली. तसेच राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर अत्यवस्थ श्री सदस्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

7 to 8 Shrisadasas die in Maharashtra Bhushan award ceremony
Appasaheb Dharmadhikari: मोठी बातमी! आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून २५ लाखांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. राज्यभरातून लाखो श्री सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. भर उन्हात हा कार्यक्रम घेण्यात पार पडला.

त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही श्री सदस्यांना उष्माघाताचा (Heat stroke) त्रास झाला. यातील 7 ते 8 श्री सदस्यांचा उष्माघातने मृत्यू झाल्याची माहिती स्वत: मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अत्यवस्थ असल्येल्या श्री सदस्यांवर कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

7 to 8 Shrisadasas die in Maharashtra Bhushan award ceremony
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : 'फडतूस म्हणजे बिनकामाचा', उद्धव ठाकरे यांचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन अत्यवस्थ रुग्णांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी डॉक्टरांना भेटलो आणि त्यांच्याशी या विषयी बोललो. अनेक लोकांना उष्माघातामुळे त्रास झाला आहे. ही दुख:द घटना आहे, मनाला वेदना देणारी घटना आहे. जखमी रुग्णांच्या उपचाराचा खर्च सरकारकडून करण्यात येणार असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

तसेच रुग्णांना चांगल्यात चांगले उपचार देण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच या घटनेत मृत्यू झालेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com