Breaking: साकीनाका बलात्कार पीडितेचे निधन
Breaking: साकीनाका बलात्कार पीडितेचे निधन

Breaking: साकीनाका बलात्कार पीडितेचे निधन

मुंबईतील साकीनाक्यातील खैरानी रोड परवा एका 30 वर्षीय महिलेवर बलात्काराची झाल्याचे वृत्त समोर आले होते

रश्मी पुराणिक

साकीनाका बलात्कार (Sakinaka Rape case) पिडीतेचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.मुंबईतील साकीनाक्यातील खैरानी रोड (khairani road) परवा एका 30 वर्षीय महिलेवर बलात्काराची झाल्याचे वृत्त समोर आले होते. याप्रकरणी साकीनाका पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून एका व्यक्तीला अटकही केली. बलात्कारानंतर संशयिताने महिलेच्या गुप्तांगात रॉड घातल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबरला साकीनाकाच्या खैरानी रोड भागात पिडीता बेशुद्धावस्थेत आढळून आली. पोलिसांनी उपचारासाठी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केलं. पीडितेची प्रकृती परिस्थिती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान तिचे निधन झाले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com