'नवरीबाई जोमात, बाकी कोमात' ! प्री-वेडिंग शूटसाठी गाठली जिम; पाहा Video

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यामधील एक महत्त्वाचा क्षण असतो आणि हा क्षण अविस्मरणीय बनवण्याकरिता प्रयत्न केला जात असतो
'नवरीबाई जोमात, बाकी कोमात' ! प्री-वेडिंग शूटसाठी गाठली जिम; पाहा Video
'नवरीबाई जोमात, बाकी कोमात' ! प्री-वेडिंग शूटसाठी गाठली जिम; पाहा VideoSaam Tv

मुंबई : लग्न Wedding video हा प्रत्येकाच्या आयुष्यामधील एक महत्त्वाचा क्षण असतो आणि हा क्षण अविस्मरणीय बनवण्याकरिता प्रयत्न केला जात असतो. याकरिता काही लोक काही ना काही तरी हटके करत राहतात Bride groom video सध्या असेच काहीतरी हटके करणाऱ्या एका नववधूचा व्हिडीओ सोशल मीडियावर Social media प्रचंड व्हायरल Viral video होत आहे. ज्यामध्ये नवरीबाई लग्नाअगोदर थेट ढोले- शोले बनवताना दिसून येत आहे.

लग्न म्हटले की सामान्यपणे नवरीची कपडे, दागिने खरेदीची घाई असते. मेकअप, फोटोशूट याची तयारी देखील मोठ्या प्रमाणात असते. पण व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये नवरीला मात्र ढोलेशोले बनवण्याची घाई आहे. लग्नाअगोदर या नवरीबाईने थेट जीम गाठली आहे. (Bride at gym video). जीम मध्ये ती चक्क एक्सरसाइझ करताना दिसत आहे. साडी नेसून, दागिने घालून, नटूनथटून ही नवरी जीममध्ये घाम गाळू लागली आहे.

पहा व्हिडिओ-

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या पोस्टनुसार हा व्हिडीओ प्री- वेडिंग शूटचा आहे (Pre wedding video). म्हणजे ही नवरी फिटनेस फ्रीक आहे आणि ती जीममध्येच प्री- वेडिंग शूट करताना दिसून येत आहे. हिमतीचे आज गुपित उलगडले असे मजेशीर कॅप्शन देखील या व्हिडीओ देण्यात आले आहे.

व्हिडीओमध्ये पाहिल्यानंतर तशाच मजेशीर प्रतिक्रिया देखील याला येत आहे. काही नेटिझन्सनी या नवरीचे कौतुक देखील करण्यात येत आहे. लग्न तोंडावर असताना अशी एक्सरसाइझ करताना दिसणारी ही पहिलीच नवरी नाही. या अगोदर देखील एक नवरी अशीच एक्सरसाइझ करताना दिसली आहे. लग्नासाठी नवरी पूर्णपणे तयार झाली, की शेवटी मेकअपचा एक टचअप राहतो.

पण या नवरीने तर टचअप करणे सोडून चक्क पुशअप्स मारायला सुरुवात केली आहे. या नवरीला मेकअप नाही तर फिटनेस अतिशय महत्त्वाचा वाटलं आहे. व्हिडीओमध्ये बघू शकता, नवरी पूर्ण तयार झाली आहे. तिने दागिने घातले आहेत आणि सुंदर असा लेहंगा देखील घातला आहे. पण अशी तयार होऊन ती एखाद्या बाहुली सारखी किंवा इतर नवरीसारखी लाजत मुरडत किंवा स्वतःला आरशामध्ये बघत बसली नाही, तर तिने आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवले आणि पुशअप्स मारायला सुरुवात केली आहे.

'नवरीबाई जोमात, बाकी कोमात' ! प्री-वेडिंग शूटसाठी गाठली जिम; पाहा Video
Airtel Plan Hike: प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर

नटूनथटून आपल्याच लग्नाच्या दिवशी नवरीने पुशअप्स मारले आहे. त्यात विशेष म्हणजे लग्नाचा लेहंगा म्हटला की तो इतका जड असतो, की सावरता सावरता साढे चालणे देखील शक्य होत नाही. पण याच लेहंग्यावर ही नवरी पुशअप्स मारताना दिसून आली आहे. यामुळे तिचे जास्तच कौतुक सर्वाना वाटतं आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com