बहिणीकडे निघालेल्या भावास लोखंडी पाईपने मारहाण; हल्लेखोरास बेड्या!

किशोर सावरे हे सोमवारी वांगणी वरून विठ्ठलवाडी येथे बहिणीकडे आले होते. रेल्वे स्थानकाजवळील पार्किंग परिसरातून जात असताना दोन जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
बहिणीकडे निघालेल्या भावास लोखंडी पाईपने मारहाण; हल्लेखोरास बेड्या!
बहिणीकडे निघालेल्या भावास लोखंडी पाईपने मारहाण; हल्लेखोरास बेड्या!प्रदीप भणगे

डोंबिवली : कल्याण जवळील विठ्ठलवाडी येथे बहिणीकडे आलेल्या किशोर सावरे यांना दोन व्यक्तींनी लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी दोन जणांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्यांचा तपास कल्याण गुन्हे शाखा घटक 3 चे पथक करीत होते. यातील एका आरोपी किरण जाधव (वय 30) यास कल्याण रेल्वे स्थानकातून गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीस कोळसेवाडी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून यातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

हे देखील पहा :

किशोर सावरे हे सोमवारी वांगणी वरून विठ्ठलवाडी येथे बहिणीकडे आले होते. रेल्वे स्थानकाजवळील पार्किंग परिसरातून जात असताना दोन जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. लोखंडी रॉडने त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या फिर्यादीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण गुन्हे  शाखा घटक 3 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सखोल माहिती काढली असता कोपर स्टेशन जवळ साई सिद्धी झोपडपट्टी मध्ये संशयित किरण रहात असल्याची माहिती मिळाली.

बहिणीकडे निघालेल्या भावास लोखंडी पाईपने मारहाण; हल्लेखोरास बेड्या!
बाब्बो जीवंत व्यक्तीला दाखवलं कोरोना मयत; आरोग्य विभागाचा प्रताप!
बहिणीकडे निघालेल्या भावास लोखंडी पाईपने मारहाण; हल्लेखोरास बेड्या!
अकोल्यात रक्तयज्ञ आंदोलन; दिल्लीतील आंदोलनात मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली!

त्याचा शोध घेतला असता कल्याण स्टेशन परिसरातून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता टिळकनगर, कोळशेवाडी, डोंबिवली, मानपाडा, बाजारपेठ आणि दादर पो.ठाणे येथील दाखल 8 गुन्ह्यांचा उलगडा झाला असल्याची माहिती दिली. आरोपीस कोळसेवाडी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून यातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com