Dombivli: बीएसएनएलचे ग्राहक सेवा केंद्र आता डोंबिवलीतही; आधार कार्ड सेंटरसह मिळणार अनेक सुविधांचा लाभ...

Dombivli News: बीएसएनएलने डोंबिवलीसह इतर ठिकाणी आधार सेंटर आणि कस्टमर सर्व्हिस सेंटर केले सुरू...
बीएसएनएलचे महाराष्ट्र सर्कलचे मुख्य जनरल मॅनेजर रामकांत शर्मा
बीएसएनएलचे महाराष्ट्र सर्कलचे मुख्य जनरल मॅनेजर रामकांत शर्माप्रदीप भणगे

डोंबिवली: बीएसएनएल (BSNL) या सरकारी टेलिफोन विभागाने खाजगी स्पर्धकाशी स्पर्धा करताना फोरजी (4G) फायबर सुविधा उपलब्ध करून दिली असून याद्वारे अतिशय वेगाने मिळणाऱ्या इतर सुविधा मिळणार आहेत आणि बीएसएनएल तसे प्लँन तयार केले आहेत. तसेच बीएसएनएलच्या माध्यमातून आधार सेंटर आणि कस्टमर सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले आहेत. याचेच उद्घाटन आज डोंबिवलीत (Dombivali) करण्यात आले असून कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, भिवंडी, वसई, पालघर येथेही अश्याच प्रकरच्या सेंटरला सुरवात केली आहे. (BSNL's customer service center now in Dombivali; Benefit of many facilities with Aadhar Card Center)

हे देखील पहा -

दरम्यान बीएसएनएलचे महाराष्ट्र सर्कलचे मुख्य जनरल मॅनेजर रामकांत शर्मा याच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी बीएसएनएलकडून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधाची माहिती दिली. तसेच बीएसएनएलच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या आधार केंद्राचा लाभ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे सांगितले. तसेच बीएसएनएलच्या डोंबिवलीमधील इमारतीवर सुमारे 240 सोलरप्लेट लावल्या असून त्याचे उद्घाटन करण्यात आले आणि याच सोलरप्लेटमुळे सुमारे वर्षाला 15 लाख रुपये वाचणार आहेत.

बीएसएनएलचे महाराष्ट्र सर्कलचे मुख्य जनरल मॅनेजर रामकांत शर्मा
'हे माझं शेवटचे अधिवेशन'; राज्य सरकारवर नाराज शिवसेना आमदाराचा आक्रमक पवित्रा

आमची फायबर ब्रॉडबँड ही स्कीम खूप प्रसिद्ध होत आहे. बीएसएनएल बँडविथ आहे, ती पिवर बँडविथ आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कॉम्प्रेमाईज केले जात नाही, त्यात पारदर्शकता असते. याव्यतिरिक्त नेटचा स्पीड जास्त पाहिजे असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन उपलब्ध आहेत. बऱ्याच क्लब स्कीम सुद्धा आहे, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ओटीटी चॅनेल्सना क्लब केले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com