कॉन्ट्रक्टर महिलेला 9 कोटींचा गंडा; अनुज आणि अंकित गोयलवर गुन्हा दाखल

पुण्यामध्ये फसवणुकीचा मोठा गुन्हा घडला आहे. बिल्डरने कंत्राटदार महिलेला तब्बल ९ कोटींना गंडा घातलाय.
कॉन्ट्रक्टर महिलेला 9 कोटींचा गंडा; अनुज आणि अंकित गोयलवर गुन्हा दाखल
Annuj Goel Saam TV

प्रविण ढमाले

पुणे: पुण्यामध्ये फसवणुकीचा मोठा गुन्हा घडला आहे. बिल्डरने कंत्राटदार महिलेला तब्बल ९ कोटींना गंडा घातलाय. फ्लॅटची दुसऱ्यांना विक्री केली असताना परत तेच फ्लॅट कंत्रादाराला कराराद्वारे विकून तसेच केलेल्या कामाचे (बांधकामाचे) पैसे न देता जवळपास ९ कोटी रुपायांची फसवणूक बिल्डरने केली आहे. या प्रकरणी मिनामानी गंगा बिल्डरवर (Meenamani Ganga Builder) पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनुज उमेश गोयल आणि अंकित उमेश गोयल अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वाती तानाजी पाटील यांनी फिर्याद दिली होती. संबंधित प्रकार पुण्यातील उंड्री येथील मिनामानी प्रकल्पात जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०२२ मध्ये घडला आहे.

नक्की प्रकरण काय?

श्री कन्ट्रक्शनच्या स्वाती पाटील आणि मिनामानी गंगा बिल्डर यांच्यात २०१८ मध्ये या प्रकल्पासाठी करार झाला होता. करारानुसार श्री कन्ट्रक्शनच्या स्वाती पाटील यांना दोन बिल्डींगचे काम मिळाले. झालेल्या करारानुसार बिल्डर ६० टक्के रक्कम ही चेक स्वरुपात देईल तर उर्वरीत रकमेचे ३ हजार स्वेअर फुटचे फ्लॅट देईल असे ठरले होते. स्वाती पटील यांनी झालेल्या कामाचे १५ कोटी ५५ लाखांचे बील मिनामानी गंगा बिल्डरला पाठवले. त्यापैकी ६ कोटी ३३ लाख ३७ हजार १६३ रुपयांच्या बिलाची रक्कम मिनामानी गंगा बिल्डरने पाटील यांना देऊ केली.

उरलेल्या रकमेपैकी १ कोटी ८८ लाख २२ हजार ६२३ रुपये चेकद्वारे दिले जाणार होते. तर ७ कोटी ३३ लाख ७० हजार १४२ रुपयांचे फ्लॅट देणार होते. वरील रकमेचे चेक पाटील यांना दिलेही परंतु बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने चेक परत आले (Check Bounced). संबंधित उंड्री येथील प्रकल्पातील दोन सदनिका बिल्डरने २०१६ आणि २०१७ साली रजिस्टर खरेदी खताने विकल्या आहेत. असे असतानाही मिनामानी गंगाचे अनुज गोयल आणि अंकित गोयल यांनी पुन्हा त्याच सदनिका श्री कन्ट्रक्शनच्या स्वाती पाटील यांना दिल्या. या संपुर्ण प्रकरणाची व्याप्ती फार मोठी आहे. सदरचे फ्लॅट विकत घेणारे लोकही यामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्यात देखिल चिंतेचे वातावरण आहे. जवळपास ९ कोटींची फसवणुक या बिल्डर बंधूंनी केली आहे. आता पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.