घाटकोपरमध्ये बेस्टच्या उद्धाटनावरुन आघाडीत बिघाडी !

बेस्टची फेरी शिवसेनेने उद्घाटन केल्यानंतरच सुरू करावी अशी मागणी करण्यात आली होती.
घाटकोपरमध्ये बेस्टच्या उद्धाटनावरुन आघाडीत बिघाडी !
घाटकोपरमध्ये बेस्टच्या उद्धाटनावरुन आघाडीत बिघाडी !SaamTV

घाटकोपर : श्रेय वादाचा लढाई वरून घाटकोपरमध्ये Ghatkopar महाविकास आघाडी मध्ये बिघाडी झालेली पाहायला मिळाली. अमृत नगर ते घाटकोपर स्टेशन या मार्गावर 416 क्रमांकाची बेस्ट बस (BEST Bus) ची फेरी सुरू करण्यात आली होती परंतु अचानक आज सकाळपासून ही बेस्ट बस ची फेरी बेस्ट प्रशासनाकडून बंद करण्यात आली. (Bus service closed due to battle for credit in Mahavikas Aghadi)

हे देखील पहा -

काँग्रेस आणि राष्ट्रवादी Congress NCP कडून या नव्या फेरीचे उद्घाटन सोमवारी करण्यात आलं होतं त्यामुळे दुसऱ्यादिवशी शिवसेनेच्या Shivsena एका पदाधिकाऱ्याने बेस्ट आगारात Best Depo फोन करून बेस्ट ची फेरी शिवसेनेने उद्घाटन केल्यानंतरच सुरू करावी अशी मागणी केली आणि मंगळवार सकाळपासून ही सेवा बंद करण्यात आली असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे.

घाटकोपरमध्ये बेस्टच्या उद्धाटनावरुन आघाडीत बिघाडी !
फडणवीस स्वप्नातही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायला तयार नाहीत; अतुल लोंढेंचा टोला

या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट विक्रोळी बेस्ट आगार गाठून बेस्ट अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा बेस्ट बस ची फेरी सुरू करण्याची मागणी केली सुरुवातीला बेस्ट अधिकाऱ्यांनी Best Officer तांत्रिक कारणामुळे ही बेस्ट बसची फेरी रद्द करण्यात आली असल्याचं सांगितलं परंतु अखेर कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्यामुळे बेस्ट प्रशासनाला पुन्हा 416 क्रमांकाची बेस्ट सेवा सुरु करावी लागली. अखेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या बेस्ट बसमधून प्रवास करत घोषणाबाजी केली.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.